समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या काही ठिकाणांवर 7 मार्चला ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे शहरात खळबळ उडाली आङे
Raids At House Of Jailed Samajwadi Party MLA : ईडीच्या पथकाकडून गुरुवारी (7 मार्च) सकाळी जाजमऊ येथील आमदार इरफान सोलंकी यांच्या काही ठिकाणांवर छापेमारी केली आहे. याआधी ईडीने सर्वांचे मोबाइल जप्त करत सीसीटिव्हीचे कनेक्शनही बंद केले होते. ईडीच्या कार्यवाहीदरम्यान कोणालाही घराबाहेर जाण्याची परवानगी नसणार आहे. याशिवाय ईडीने इरफान यांचा भाऊ अरशद यांच्या घरावरही छापेमारी केली आहे.
एका वर्षांपासून तुरुंगात इरफान
समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी तुरुंगात बंद आहेत. इरफान यांच्या विरोधात काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जमिनीवर अतिक्रमण करत महिलेला जाळल्याच्या प्रकरणात इरफान एका वर्षांपासून तुरुंगात आहेत. इरफान सोलंकीच्या विरोधात जाळपोळ, आचार संहितेचे उल्लंघन करण्यासह अन्य काही प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मतदान करण्याचीही परवानगी नाही
राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान (Rajya Sabha Election आमदार इरफान सोलंकी यांनी मदतान करण्याची कोर्टाकडे मागणी केली होती. पण कोर्टाने मतदानासाठी इरफान यांना परवानगी नाकारली होती. कोर्टाने इरफान यांची याचिका फेटाळून लावली होती. उत्तर प्रदेशातील महाराजगंज तुरुंगात बंद असलेले इरफान पटेल यांच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. याशिवाय इरफान बनावट आधार कार्ड (Aadhar Card) प्रकरणातील आरोपी आहेत. नातेवाईकांसह इरफानमधील कानपुरच्या एमपी एएलए कोर्टाने आरोपी ठरविले होते. या प्रकरणातील पुढील सुनावणी येत्या 18 मार्चला होणार आहे. याआधीच इरफान यांच्या ठिकाणांव ईडीने छापेमारी केली आहे.
महिलेची जमीन हडपल्याचे प्रकरण
इरफान यांच्या विरोधात एका महिलेची जमीन बळकावल्यासह तिला जाळल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात इरफान आरोपी असून सध्या ते तुरुंगात आहेत.
आणखी वाचा :
Rajsthan : राजस्थानमधील शिक्षक वर्गात राक्षस बनत आहेत, नेमकं काय आहे प्रकरण?