पंतप्रधानांच्या घराबाहेरून राहुल गांधींना केलं अटक, प्रियांका गांधींनी केला विरोध

Published : Jul 21, 2026, 07:32 PM IST
Rahul Gandhi protest

सार

दिल्लीत विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली. काँग्रेसने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दिल्ली: दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर धरणे धरले आहे. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पवन खेरा आणि इतर नेते उपस्थित होते.

राहुल गांधींनी एक्सवर काय लिहिलं? 

राहुल गांधी लिहितात की, सरकारने एक दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना अमानुष अत्याचार केला. आता सरकार कोणतीही जबाबदारी घेत नाही आणि संसदेत चर्चा करत नाही. सरकार याबद्दल उत्तर देत नाही. गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांनी युवांचे भविष्य बरबाद करण्यासाठी राजीनामा द्यायला हवं. यावेळी काँग्रेस नेत्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली.

राहुल गांधींना केलं अटक

राहूल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांसोबत पंतप्रधानांच्या घरासमोर धरण धरलं आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना अटक केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल यांनी केली. प्रियांका गांधींनी यावेळी पोलिसांचा प्रतिकार केला. त्याआधी पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलं होतं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Rahul Gandhi FIR: जातीय टिप्पणी भोवली? राहुल गांधींवर गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Royal Enfield: 125 व्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन, जगभरात होणार 'वन राईड'!