Rahul Gandhi Arrest : राहुल-प्रियांका अटकेत, PM हाऊस समोरुन रस्त्यावर फरफटत नेलं

Published : Jul 21, 2026, 07:54 PM IST
Rahul Gandhi Arrest : राहुल-प्रियांका अटकेत, PM हाऊस समोरुन रस्त्यावर फरफटत नेलं

सार

CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियांका गांधींसह अनेक नेत्यांना अटक केली.

नवी दिल्ली: CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधानांच्या घराबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अनेक मोठ्या नेत्यांना बळाचा वापर करून अटक केली. यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाही समावेश आहे. राहुल गांधी यांना तर पोलिसांनी अक्षरशः रस्त्यावरून फरफटत नेत अटक केली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून, परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. आंदोलन करणाऱ्या सर्व खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

CJP आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. यावेळी अनेक खासदारांनी आपले हात बांधून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन आणि के. सी. वेणुगोपाल हे देखील सहभागी झाले होते. 'पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,' अशी मागणी राहुल गांधींनी केली. 'तरुणांना झालेल्या अमानुष मारहाणीचं उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवं. सरकारने तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे,' असा घणाघातही त्यांनी केला.

दुसरीकडे, 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी डाव्या पक्षांचे खासदारही जंतर-मंतरवर पोहोचले होते. 'परीक्षांमधील गोंधळामुळे देशातील तरुण संतप्त झाले आहेत. पंतप्रधानांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा,' अशी मागणी डाव्या खासदारांनी केली.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर, तुमच्या शहरात आजचा भाव काय?
Rahul Gandhi FIR: जातीय टिप्पणी भोवली? राहुल गांधींवर गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण