पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील कोसी आणि ब्लॅक हे दोन पब उत्पादन शुल्क विभागाने केले बंद, आरोपीवर होणार कठोर कारवाई

पुणे येथे शनिवारी रात्री घडलेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील आरोपीने भेट दिलेले दोन बार कोसी आणि ब्लॅक हे बंद करण्यात आले आहेत. येथे पुणे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. 

vivek panmand | Published : May 22, 2024 2:47 AM IST

शनिवारी रात्री पुणे येथील कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देश खवळून निघाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर व्हिडीओ बनवून पोस्ट केला आहे. या प्रकरणी अल्पवयीन प्रमुख आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याचे वडील विकास अग्रवाल, बार मालक आणि बार मॅनेजर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

कोसी आणि ब्लॅक या दोन पबला केले बंद - 
पुणे उत्पादन शुल्क विभागाने कोसी आणि ब्लॅक या दोन पबला ब्लॉक केले आहे. या दोनही पबमध्ये शनिवारी रात्री आरोपी दारू पिण्यासाठी गेला होता. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने ही कडक कारवाई केली आहे. आरोपी मुलाला घटना घडल्यानंतर पंधरा तासांनी जामीन मंजूर करण्यात आला होता. आरोपीला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. 

आरोपीचे वडील मोठे व्यावसायिक - 
आरोपीचे वडील हे पुणे येथील बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यावसायिक असून त्यांनी या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या वडिलांना आपला मुलगा दारू पितो आणि दारू पिऊन गाड़ी चालवतो हे माहीत होते, असा जबाब आरोपी मुलाने दिला आहे. मुलाने दारू पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दारू पिल्यानंतर आरोपीने पन्नास हजार रुपयांचे बिल भरल्याचे सांगण्यात येत आहे. अनिश आणि अश्विनी या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अल्पवयीन आरोपीला अटक केल्यानंतर त्याला बाल न्याय मंडळापुढे सादर करण्यात आले होते. त्यामध्ये त्याला पाच अटींच्या शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला होता. पण स्थानिक लोक आणि लोकप्रतिनिधींनी याविरोधात आवाज उठवल्यावर आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली. 
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण?, स्वत:च केलं जाहीर; म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत 25 हजार महिलांशी संवाद साधणार, रॅलीतील महिलांच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आयोजित केला कार्यक्रम

Share this article