Priyanka Gandhi: 'एवढी सुरक्षा नको, लोकांना त्रास होतोय', वायनाड दौऱ्यात प्रियांका गांधी संतापल्या

vivek panmand   | CMS
Published : Sep 23, 2026, 04:00 PM IST
Priyanka Gandhi: 'एवढी सुरक्षा नको, लोकांना त्रास होतोय', वायनाड दौऱ्यात प्रियांका गांधी संतापल्या

सार

वायनाड दौऱ्यात प्रियांका गांधींना दिलेल्या कडेकोट सुरक्षेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या सुरक्षेमुळे सामान्य लोकांना नाहक त्रास होत असल्याचं त्या म्हणाल्या. असाच प्रकार पुढेही राहिल्यास दौऱ्याची माहिती आधी देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मलप्पुरम: आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर असताना खासदार प्रियांका गांधी यांनी त्यांच्या कडेकोट सुरक्षेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला एवढ्या मोठ्या सुरक्षेची अजिबात गरज नाही, असं त्या म्हणाल्या. सुरक्षारक्षकांच्या या मोठ्या ताफ्यामुळे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागतोय, हे त्यांनी स्पष्ट केलं.

प्रियांका गांधी यांनी थेट सीआरपीएफ (CRPF) अधिकाऱ्यांनाच आपली नाराजी बोलून दाखवली. जर इथून पुढेही असाच प्रकार सुरू राहिला, तर मी माझ्या मतदारसंघातील दौऱ्याची माहिती तुम्हाला आधी देणार नाही, असा इशाराच प्रियांका गांधी यांनी दिला आहे.

एशियानेट न्यूजचे अपडेट्स लाईव्ह पाहा

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Waste Management Revenue : कचऱ्यातून केंद्राने कमावले तब्बल 6 हजार कोटी; सरकारची भन्नाट आयडिया
Sanjay Shirsat | सत्ताबदलावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला