पंतप्रधान मोदी कारगिल शहीदांना श्रद्धांजली वाहून प्रकल्पाची करणार पायाभरणी

Published : Jul 26, 2024, 09:14 AM IST
modi kargil

सार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील आणि 1999 च्या कारगीर युद्धात बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहतील. पंतप्रधान सकाळी 9.20 वाजता स्मारकाला भेट देतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कारगिल विजय दिवसानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील आणि युद्धात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना पुष्प अर्पण करतील. 1999 च्या कारगीर युद्धात, सैनिकांनी उंच डोंगरावर बसलेल्या शत्रूंचा सामना करून शत्रूंना हुसकावून लावले होते. पंतप्रधान सकाळी 9.20 वाजता कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील.

कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत

कारगिल युद्ध भारताने जिंकले असले तरी कोणतेही युद्ध हे आनंदाचे प्रसंग नसते. कारगिल युद्धात शत्रूंसह देशाचे शेकडो जवान शहीद झाले. आज कारगिल युद्धाला 25 वर्षे पूर्ण झाली, पण युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूची धग अजूनही ताजी आहे.

कारगिल युद्ध स्मारकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी कारगिल युद्ध स्मारकाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता भासू नये म्हणून प्रवेशद्वार ते युद्धस्मारकापर्यंत अनेक सुरक्षा चौक्या बनवण्यात आल्या आहेत. एसपीजी कमांडोंनी कारगिल युद्ध स्मारकाची सुरक्षा घेतली आहे.

शिंकुन ला टनेल प्रकल्पाची पायाभरणी करणार

आज संपूर्ण देश कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी या खास प्रसंगी शिंकुन ला बोगद्याची पायाभरणी करणार आहेत. पीएमओने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कोणत्याही हंगामात लेहशी संपर्क तुटणार नाही. हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल. त्याची लांबी 4.1 किमी आहे. निमू पदुम दारचा रोडवर 15 हजार 800 फूट उंचीवर हा बोगदा बांधण्यात येत आहे. या बोगद्याद्वारे सशस्त्र दल आणि इतर सामानाची अखंडित वाहतूक सुनिश्चित केली जाईल.
आणखी वाचा - 
Kargil Vijay Diwas निमित्त मेसेजच्या माध्यमातून भारताच्या शूरवीरांना करा सलाम
Pune Rain : पुण्यात पावसाचा कहर, अनेकांच्या घरात शिरले पाणी, 3 जणांचा मृत्यू

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

Recommended Stories

Amit Shah Delhi Police: अमित शाह थेट दिल्ली पोलीस मुख्यालयात, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
Google Privacy Policy: गुगलची प्रायव्हसी पॉलिसी बदलली, तुमचे फोटो आणि ईमेल्स वाचून दाखवणार जाहिराती