Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली व किती दिली? जाणून घ्या

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली? जाणून घ्या माहिती…

Harshada Shirsekar | Published : Jan 9, 2024 6:29 PM / Updated: Jan 12 2024, 12:11 PM IST
19
अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी

अयोध्येतील राम मंदिरासाठी देश-परदेशातील रामभक्तांनी उदार मनाने देणगी दिली आहे. रामभक्तांनी एवढी देणगी दिली की याद्वारे मिळालेल्या व्याजाच्या पैशातून मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होईल, असे म्हटले जात आहे.

29
किती मिळाली देणगी?

राम मंदिरासाठी आतापर्यंत 5 हजार कोटी रूपयांहून अधिक देणगी मिळाली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधि खात्यात 3 हजार 200 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

39
मंदिरासाठी किती लोकांनी दिली देणगी

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार, राम मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत जवळपास 18 कोटी रामभक्तांकडून 3 हजार 200 कोटी रुपयांची देणगी समर्पण निधि खात्यात जमा झाली आहे.

49
देणगीद्वारे मिळालेल्या पैशांची अशी केली गुंतवणूक

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माहितीनुसार ट्रस्टने बँक खात्यामध्ये प्राप्त झालेल्या देणगीच्या पैशांची एफडीमध्ये गुंतवणूक केली. ज्याद्वारे मिळालेले व्याजाच्या पैशातूनच मंदिराचे आतापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले.

59
सर्वाधिक देणगी कोणी दिली?

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी दिली आहे. त्यांनी मंदिरासाठी 11.3 कोटी रूपयांची देणगी दिली आहे.

69
मोरारी बापू यांच्या अनुयायांनीही दिली देणगी

अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये स्थायिक असलेल्या मोरारी बापू यांच्या अनुयायांकडूनही अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी 8 कोटी रूपयांची देणगी देण्यात आली.

79
सर्वाधिक देणगी देणारी दुसरी व्यक्ती

राम मंदिर उभारणीसाठी गुजरातमधील हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी 11 कोटी रूपयांची देणगी दिली. ढोलकिया हे डायमंड कंपनी श्रीराम कृष्णा एक्सपोर्ट्सचे मालक आहेत.

89
पहिली देणगी कोणी दिली?

राम मंदिर निर्माणासाठी देणगी घेण्याची सुरुवात 14 जानेवारी 2021 पासून झाली. त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 5 लाख रूपयांची देणगी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला चेक स्वरुपात दिली होती.

99
परदेशातूनही मिळाली देणगी
Read more Photos on
Share this Photo Gallery
Recommended Photos