मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या अधिवेशनात भाषण दिले आहे.
President Droupadi Murmu's Speech : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरच्या अर्थसंकल्पाचे अधिवेशन आजपासून (31 जानेवारी) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) संसदेच्या बाहेर आपले मत मांडले. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले की, वर्ष 2023 भारतासाठी ऐतिसाहिक कामगिरीने भरलेले होते. याशिवाय खासदारांना महिला आरक्षाचा कायदा तयार केल्याने शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांनी आशियाई खेळातील इतिहासात सर्वाधिक पदके, चांद्रयान- 3 चे यश, राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. राष्ट्रपतींच्या संबोधनानंतर सरकारकडून संसदेत आर्थिक सर्व्हेक्षणाचा रिपोर्ट सादर केला जाणार आहे.
राष्ट्रपतींनी मांडला मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षातील कामाचा लेखाजोखा मांडत म्हटले की, वर्ष 2023 भारतासाठी काही ऐतिहासिक कामगिरीने भरलेले होते. सरकारने रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मची वचनबद्धता सातत्याने पूर्ण केली आहे. नव्या संसदेतील माझे हे पहिले भाषण असल्याचेही मुर्मू यांनी म्हटले.
गुलामगिरीचे कायदे आता इतिहासजमा झालेत- द्रौपदी मुर्मू
द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात राम मंदिराचा उल्लेख केला. राम मंदिराचे स्वप्न प्रदीर्घ काळापासून पाहिले जात होते, ते वर्ष 2024 मध्ये पूर्ण झाले. याशिवाय गुलामगिरीचे कायदे आता इतिहासजमा झाल्याचेही द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले. तिहेरी तलाक सारख्या कुप्रथा संपवण्यासाठी सरकारने कठोर नियम लागू केले आहेत.
25 कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले
नीति आयोगानुसार, मोदी सरकारच्या एका दशकाच्या कार्यकाळात जवळजवळ 25 कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले आहे. हे प्रत्येक गरीब नागरिकात नवा विश्वास निर्माण होणारी बाब आहे.
यंदाचा अर्थसंकल्प ठरणार महत्त्वाचा
यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणूक लवकरच होणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेत मिळणारी रक्कम सहा हजार रूपयांवरुन नऊ हजार रूपये होण्याची शक्यता आहे. याशिवाय महिला शेतकऱ्यांसाठी ही रक्कम 10 ते 12 हजार रूपयांपर्यंत करण्यात येऊ शकते.
आणखी वाचा :
स्वस्त होणार स्मार्टफोन, अर्थसंकल्पापूर्वी सरकारचे नागरिकांना गिफ्ट
Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष, कृषी क्षेत्रासाठी या घोषणेची शक्यता