स्वस्त होणार स्मार्टफोन, अर्थसंकल्पापूर्वी सरकारचे नागरिकांना गिफ्ट
मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याआधी मोबाइल पार्ट्सवरील आयात शुक्ल कमी केला आहे. यामुळे मोबाइल पार्ट्सवरील आयात शुक्ल 15 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर आला आहे.
मोबाइल पार्ट्सवरील आयात शुक्ल कमी केल्याने देशातील नागरिकांना खिशाला परवडणाऱ्या किंमतीत फोन खरेदी करता येईल.
अर्थमंत्रालयाने एक परिपत्रक जारी करत मोबाइल पार्ट्सवरील आयात शुक्लासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार कस्टम अॅक्ट 1962 च्या कलम 25 अंतर्गत जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे.
मोबाइल तयार करण्यासाठी वापरले जाणारे पार्ट्स किंवा इनपुट्सवरील आयात शुल्क कमी करण्यात आला आहे.
बॅटरी कव्हर, फ्रंट कव्हर, मेन लेन्स, बॅक कव्हर, GSM अँटीना, PU केस किवा सीलिंग गास्केट, ईपीएस,ईसी, सिम सॉकेट आणि स्क्रू सारखे पार्ट्स.
कंडक्टिव्ह क्लॉथ, एलसीडी कंडक्टिव्ह फोन, एलसीडी फोन, बीटी फोम आणि स्टिकर बॅटरी स्लॉट.
स्मार्टफोन, फीचर किंवा बेसिक फोनवरील आयात शुल्क कमी झाल्याने देशाबाहेरुन फोनचे पार्ट्स आयात करणे स्वस्त होणार आहे. याशिवाय फोनसाठी स्वस्ते पार्ट्स आयात केले जाऊ शकतात.