PM Modi Ayodhya Visit : आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत उद्घाटन

Published : Dec 30, 2023, 09:27 AM ISTUpdated : Jan 12, 2024, 01:31 PM IST
pm modi

सार

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येतील विमानतळ ते वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रोजेक्टचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

PM Modi in Ayodhya : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (30 डिसेंबर, 2023) अयोध्येत येणार आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते 15 हजार कोटी रूपयांच्या प्रोजेक्ट्सला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानक, महामार्ग आणि रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय काही महत्त्वाच्या रस्त्यांचे उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी अयोध्येत तयारी
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Uttar Pradesh CM Yogi Adityanath) आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी प्रकल्पांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या तयारीबद्दल आढावा घेतला.

अयोध्येतील वाहतूकीच्या उत्तम सुविधेसाठी अयोध्येतील रेल्वे स्थानकाचा कायापालट केला असून त्याला 'अयोध्या धाम जंक्शन' (Ayodhya Dham) नाव दिले आहे. या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यासाठी 240 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील प्रकल्पांचे उद्घाटन
अयोध्येच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन अमृत भारत एक्सप्रेसला (Amrit Bharat Express) हिरवा कंदील दाखवणार आहेत. यापैकी एक ट्रेन दरभंगा-अयोध्या ते आनंद विहार टर्मिनल दरम्यान चालवली जाणार आहेत. दुसरी ट्रेन मालदा टाउन ते विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू दरम्यान चालवली जाणार आहे. याशिवाय सहा नव्या वंदे भारत एक्सप्रेसही (Vande Bharat Express)  सुरू होणार आहेत.

अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळ
पंतप्रधानांच्या हस्ते आज अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही उद्घाटन केले जाणार आहे. या विमानतळाला 'महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ' (Maharishi Valmiki International Airport) नाव देण्यात आले आहे. याशिवाय अयोध्येतील अन्य काही नव्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान आज करणार आहेत.

आणखी वाचा: 

Ram Mandir : रामललांच्या दर्शनासाठी मुंबईत ते अयोध्यापर्यंत शबनमचा पायी प्रवास, कोण आहे ही तरूणी?

अयोध्येतील विमानतळाचे PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 84 सेकंदाचा शुभ मुहूर्त या कारणास्तव आहे खास

PREV

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!