पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन, पाहा PHOTOS
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (2 डिसेंबर, 2024) तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले आहे. ही इमारत 1100 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आली आहे.
Chanda Mandavkar | Published : Jan 2, 2024 2:33 PM / Updated: Jan 02 2024, 02:35 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तमिळनाडूत स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तमिळनाडूतील (Tamil Nadu) तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) येथे स्वागत करण्यात आले. यावेळी तमिळनाडूचे राज्यपाल श्री. आरएन. रवी, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत होते.
दीक्षांत सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38व्या दीक्षांत सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. यावेळी यावेळी तमिळनाडूचे राज्यपाल श्री. आरएन, रवी, मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन उपस्थितीत होते.
विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी
पंतप्रधानांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विमान, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस, शिपिंग आणि उच्च शिक्षण क्षेत्रांसंबंधिक 20 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक किंमतीच्या काही विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.
पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूमधील रेल्वे, रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. याशिवाय पंतप्रधानांनी दक्षिण जिल्ह्यांना जोडणाऱ्या काही रेल्वे प्रकल्पांचेही उद्घाटन केले.
कामराजर बंदराच्या जनरल कार्गो बर्थ-2
पंतप्रधानांनी कामराजर बंदराच्या जनरल कार्गो बर्थ-2 चे उद्घाटन केले. याशिवाय नऊ हजार कोटी रूपयांहून अधिक किंमतीचे पेट्रोलियअम आणि नैसर्गिक प्रकल्पाची पायाभरणी केली.
याशिवाय कलपक्कममध्ये इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात 400 कोटी रूपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या विकसित डेमेस्ट्रेशन फास्ट रिअॅक्टर फ्युअल रीप्रोसेसिंग प्लांटचेही उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील नव्या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसह अन्य काही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पंतप्रधानांनी तमिळनाडूतील जनतेला संबोधित केले.