PM Modi in Parliament : अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील वाचा महत्त्वाचे मुद्दे
संसदेत अर्थसंकल्पाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहाला संबोधित केलेल्या बैठकीवर आपले उत्तर देत आहेत.
Chanda Mandavkar | Published : Feb 7, 2024 10:12 AM IST / Updated: Feb 07 2024, 05:56 PM IST
PM Modi in Parliament : संसदेत अर्थसंकल्पाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींनी अर्थसंकल्पापूर्वी केलेल्या संबोधनावर आभार प्रस्तावाचे उत्तर देत आहेत. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत. या दरम्यान, पंतप्रधानांनी विरोधी पक्षावरही जोरदार टिका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्प सादर करण्याआधी दोन्ही सभागृहाला संबोधित केले होते. यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या संबोधनावर आभार मानले.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले, माझा विश्वास दृढ झालाय की काँग्रेस पक्षाचा विचार आउटडेटेड झाला आहे. पाहता पाहता ऐवढ्या दशकांपर्यंत देशावर राज्य करणारा पक्ष कमी होत गेलाय.
काँग्रेवर हल्लाबोल करत मोदींनी म्हटले, काँग्रेसने ओबीसींना पूर्णपणे आरक्षण दिले नाही, सामान्य वर्गातील गरिबांना आरक्षण दिले नाही, बाबा साहेब आंबेडकरांना भारत रत्नासाठी योग्य मानले नाही. केवळ आपल्या परिवाराला भारत रत्न देत राहिले. तेच आम्हाला आता सामाजिक न्यायाचा धडा शिकवत आहेत.
आपल्या सर्वांना माहितेय की, स्वातंत्र्यानंतर देशात गुलामीची मानसिकतेला कोणी प्रोत्साहन दिले. याशिवाय काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हटले की, तुम्ही इंग्रजांशी प्रभावित नव्हता तर इंग्रजांनी तयार केलेले दंड संहिता का बदलले नाहीत.
तरुण, महिला, गरीब आणि आपला शेतकऱ्यांच्या समस्या आणि स्वप्न एकसमान आहेत. याशिवाय या चार वर्गातील समस्यांचे निवारण एकसमान नसल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरु यांचा उल्लेख केला. नेहरुंनी एकदा मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मला कोणतेही आरक्षण आवडत नसल्याचे म्हटले होते. खासकरुन नोकरीमधील आरक्षणाबद्दल नेहरुंनी म्हटले होते. यामुळे मला देखील नोकरीमधील आरक्षण आवडत नसल्याचे मोदींनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या 10 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीत होती. दुसऱ्या बाजूला आमच्या 10 वर्षांमध्ये भारत पाच मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक बनला आहे. आमची 10 वर्षे निर्णायत्मक निर्णयांसाठी नेहमीच आठवणीत राहतील असेही मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी राज्यसभेतील भाषणात म्हटले की, येणाऱ्या पुढील पाच वर्षांमध्ये नव्या सामान्य वर्गाला नव्या उंचीवर पोहोचवणार आहोत. यासाठी आम्ही सामाजिक न्यायाचे मोदी कवच अधिक मजबूत करणार आहोत. आम्ही देशातील 26 कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.
आमचे 3.0 काळ सुरू होणार आहे. विकासाची चाल संथ गतीने होऊ देणार नाही. आमचा कार्यकाळ दूर नाही. देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली जाईल, गरिबांसाठी घर बांधली जाणार आहेत. पक्की घर देण्याचे अभियान सुरू राहणार आहे. याशिवाय पुढील पाच वर्षांमध्ये देशात बुलेट ट्रेनही पाहायला मिळेल. सर्व कामे वेगाने सुरू असून AI चा सर्वाधिक वापर भारतात होणार असल्याचेही मोदींनी राज्यसभेतील भाषणात म्हटले आहे.