आधार कार्डच्या या नियमांत झालेत बदल, जाणून घ्या अधिक

आधार कार्ड संबंधित UIDAI कडून काही नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया याबद्दल अधिक...

Chanda Mandavkar | Published : Jan 19, 2024 7:12 AM IST / Updated: Jan 20 2024, 10:37 AM IST

Aadhar Card New Rules :  तुम्हाला आधार कार्ड अपडेट किंवा त्यामध्ये एखादा बदल करायचा असल्यास युआयडीएआय (UIDAI) कडून काही नियमांत बदल करण्यात आले आहेत, त्याबद्दल आधी जाणून घ्या. युआयडीएआय कडून आधार कार्डचे रजिस्ट्रेशन ते अपडेट करण्यासंबंधित नियमांत बदल करण्यात आले आहेत. यासाठी नवे फॉर्मही जारी करण्यात आले आहेत.

आधार कार्डच्या नियमात बदल
रिपोर्ट्सनुसार, आधार कार्डमध्ये डेमोग्राफिक डेटा जसे की, तुमचे नाव, पत्ता अपडेट करणे आधीपेक्षा आता सोपे होणार आहे. यासाठी दोन पर्यायांचा वापर तुम्हाला करता येणार आहे. त्यानुसार, तुम्ही कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन आधार कार्डमध्ये अपडेट करू शकता. याशिवाय ऑनलाइन पद्धतीनेही आधार कार्ड अपडेट करू शकता.

जुन्या नियमांनुसार, ऑनलाइन पद्धतीने केवळ तुम्ही पत्ता अपडेट करू शकत होता. पण नावासाठी ओळखपत्राची आवश्यकता होती. नव्या नियमांनुसार, आधार कार्डवर काही माहिती तुम्हाला ऑनलाइनच अपडेट करता येणार आहे. याशिवाय लवकरच मोबाइल क्रमांक अपडेट करण्यासाठी नियम लागू केला जाऊ शकतो.

आधार कार्डसंबंधित नवा फॉर्म
आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठी जुन्या फॉर्मऐवजी नवा फॉर्म जारी करण्यात आला आहे. नव्या फॉर्मचा वापर आधार कार्ड रजिस्ट्रेशनसाठी 18 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या भारतीय निवासी नागरिकांना करता येणार आहे.

एनआरआय (NRI) व्यक्तींसाठी फॉर्म-2 चा वापर करणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय ज्या एनआरआय व्यक्तींचा पत्ता भारतातील आहे त्यांनी फॉर्म-3 चा वापर करुन आधार कार्डमध्ये बदल करावेत. फॉर्म-4 चा वापर एनआरआय मुलं, ज्यांचा पत्ता परदेशातील आहे त्यांच्यासाठी आहे. अशाप्रकारे फॉर्म-5 ते फॉर्म 9 पर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी नवे फॉर्म जारी करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : 

IndiGoच्या प्रवाशांनी रनवे वर खाल्ले फूड, मुंबई विमानतळाच्या अधिकाऱ्यांसह इंडिगो कंपनीला केंद्राने धाडली नोटीस

FASTag येत्या 31 जानेवारीपर्यंत करा अपडेट, अन्यथा....

या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा

Share this article