१. सर्वात आधी PM-KISAN च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
२. तिथे ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आवश्यक माहिती भरा.
४. ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
५. यानंतर तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन, ई-केवायसी आणि पेमेंट स्टेटस पाहू शकता.
ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, जमिनीच्या कागदपत्रांमध्ये अडचण आहे किंवा बँकेचे तपशील चुकीचे आहेत, त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. याशिवाय योजनेच्या नियमांनुसार काही गटांना हा लाभ मिळत नाही. त्यामुळे पुढचा हप्ता येण्यापूर्वी तुमची पात्रता आणि कागदपत्रे तपासून पाहणे खूप महत्त्वाचे आहे.