Viral Video: 'पायलटला जाऊन विचारा!', लँडिंगला उशीर झाल्यानं महिला क्रूवर भडकली, व्हिडीओ व्हायरल

Published : Sep 13, 2026, 03:56 PM IST
Viral Video: 'पायलटला जाऊन विचारा!', लँडिंगला उशीर झाल्यानं महिला क्रूवर भडकली, व्हिडीओ व्हायरल

सार

विमान लँडिंगला उशीर होत असल्याने एक महिला केबिन क्रूवर चांगलीच भडकली. 'बाकीची विमानं उतरत आहेत, मग आपलंच का नाही?' असा सवाल करत तिने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. यात एक महिला विमान लँडिंगला उशीर झाल्यामुळे केबिन क्रूवर ओरडताना दिसत आहे. तिचा दावा होता की बाकीची विमानं आरामात लँड होत आहेत, मग आपलंच विमान का हवेत घिरट्या घालतंय? यावरून तिने क्रू मेंबर्ससोबत जोरदार वाद घातला.

“दुसरी सगळी विमानं कशी काय लँड होत आहेत आणि आपलंच का नाही?” असा प्रश्न ती विचारते. गेल्या अर्ध्या तासात १५ ते २० विमानं उतरल्याचा दावाही ती करते. “मला कारण जाणून घ्यायचं आहे. जा, पायलटला विचारा आणि मला सांगा,” असं ती पुन्हा पुन्हा क्रू मेंबरला सांगताना व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

विमानातल्या दुसऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर शेअर केला. 'या बाई एव्हिएशन, फिजिक्स आणि कॉमन सेन्सलाच आव्हान देत आहेत,' अशा खोचक कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

प्रवाशांनी केली क्रूची बाजू मांडली

हा व्हायरल व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. खासकरून हवामान खराब असताना प्रवाशांनी पायलटांच्या निर्णयावर प्रश्न विचारावेत का, यावर वादविवाद सुरू झाला.

एका युझरने कमेंटमध्ये लिहिलं की, खराब हवामानात वेगवेगळ्या विमानांची क्षमता वेगवेगळी असते. जसं की, एअरबस A320 ज्या परिस्थितीत उतरू शकत नाही, तिथे बोईंग 777, बोईंग 787, एअरबस A330 किंवा एअरबस A380 सारखी मोठी विमानं उतरू शकतात.

विमानाचं वजन, इंधन आणि इतर तांत्रिक गोष्टींवरही लँडिंगचा निर्णय अवलंबून असतो, असंही त्याने स्पष्ट केलं.इतर प्रवाशांनीही सांगितलं की, बाहेर दिसणाऱ्या दृश्यावरून लँडिंगच्या परिस्थितीचा अंदाज लावता येत नाही.

“कॉकपिट म्हणजे काही लोकशाही नाही,” असं एकाने लिहिलं. याचा अर्थ, पायलट प्रवाशांच्या मागणीनुसार नाही, तर नियमांनुसार आणि सुरक्षेची खात्री करूनच निर्णय घेतात.“दुसरी विमानं उतरत आहेत याचा अर्थ आपलं विमानही सुरक्षितपणे उतरू शकतं, असं नाही,” असंही एकाने म्हटलं. महिलेच्या 'जाऊन विचारा' या मागणीची अनेकांनी खिल्ली उडवली. 'तुम्हाला जास्त कळत असेल तर तुम्हीच विमान लँड करा,' असा टोलाही एकाने लगावला.

अभिनेत्री डायना पेंटीची प्रतिक्रिया

या व्हिडीओवर अभिनेत्री डायना पेंटीनेही (Diana Penty) कमेंट केली आहे. 'बरं झालं ही पायलट नाहीये,' असं तिने लिहिलं. ती पुढे म्हणाली की, ‘पायलट आवश्यक परवानग्यांशिवाय विमान उतरवू शकत नाहीत आणि क्रूवर ओरडल्याने काहीही होणार नाही.’काही युझर्सनी महिलेच्या वागण्यावर टीका केली, तर काहींनी तिच्या आत्मविश्वासाची फिरकी घेतली.

'विमानं रांगेत येऊन लँड करतात असं तिला वाटतंय का?' असा सवाल एकाने केला. तर दुसऱ्याने 'या बाईने चॅटजीपीटीकडून एव्हिएशन लँडिंगमध्ये पीएचडी केली आहे,' अशी गंमतीशीर कमेंट केली.या व्हिडीओमुळे प्रवाशांचं वर्तन, विमान प्रवासातील सुरक्षा आणि प्रवाशांना जे दिसतं व प्रत्यक्षात पायलटांना जे निर्णय घ्यावे लागतात, यातील फरक यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

त्या विमानाला लँडिंगसाठी उशीर का झाला, याचं नेमकं कारण व्हिडीओतून स्पष्ट होत नाही. हवामान, धावपट्टीची स्थिती, एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सूचना किंवा इतर अनेक तांत्रिक कारणांमुळे लँडिंगला परवानगी दिली जात नाही.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

RBI Monetary Policy : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? अर्थतज्ज्ञांमध्ये मतभेद
Petrol Diesel Prices Today : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाचा तुमच्या शहरातील रेट्स