Viral Video : रीलसाठी SUV नदीत घातली, पण फसली! मग पोलिसांना बोलवावं लागलं, पाहा व्हिडिओ

Published : Sep 13, 2026, 09:37 AM IST
Viral Video : रीलसाठी SUV नदीत घातली, पण फसली! मग पोलिसांना बोलवावं लागलं, पाहा व्हिडिओ

सार

सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही तरुणांनी चक्क आपली SUV नदीत घातली. पण गाडी पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकली आणि बाहेर काढता आली नाही. अखेर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने गाडीला बाहेर काढावं लागलं. या तरुणांच्या जीवघेण्या स्टंटबाजीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

श्रीनगर : सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तरुण-तरुणी जीवघेणे स्टंट करतात, हे काही नवीन नाही. अनेकदा हे स्टंट त्यांच्या जीवावर बेततात, तर काही वेळा मोठी दुर्घटना होता होता टळते. असाच एक प्रकार जम्मू-काश्मीरच्या सोनमर्गमध्ये घडला आहे. इथे काही तरुणांनी एक रील बनवण्यासाठी आपली SUV थेट नदीत उतरवली, पण त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

वेगाने वाहणाऱ्या नदीत गाडी घातली

व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही तरुण आपली SUV गाडी थेट नदीच्या पाण्यात घालतात. सोशल मीडियावर एक भारी रील बनवून व्हायरल होण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण सोनमर्गमधील सिंध नदीचा प्रवाह कधीही वाढू शकतो, याचा त्यांना अंदाज आला नाही. गाडी पाण्यात पुढे गेली, पण प्रवाहामुळे आणि दगडांमुळे ती तिथेच अडकून बसली. थोडी जरी चूक झाली असती, तर गाडी प्रवाहासोबत वाहून गेली असती आणि मोठा अपघात झाला असता.

नदीच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाचा वेग याचा विचार न करता या तरुणांनी फक्त एका रीलसाठी हा धोका पत्करला. गाडी पाण्यात उतरवली खरी, पण त्यांना ती बाहेर काढताच आली नाही. अखेर, त्यांना पोलीस आणि स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागली. व्हिडिओच्या सुरुवातीला पोलिसांची जीप घटनास्थळी पोहोचताना दिसत आहे.

हे सगळं फक्त एका रीलसाठी!

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणांना चांगलंच सुनावलं आहे. 'रील आणि काही लाईक्ससाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना काय म्हणावं?' असा सवाल अनेक जण विचारत आहेत. एका युझरने तर, "ज्यांच्याकडे SUV असते, त्यांच्याकडे बुद्धी नसते," अशी खोचक कमेंट केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याच्या ट्रेंडवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी 'रील व्हायरल होण्याआधी स्वतःची सुरक्षा महत्त्वाची आहे' असा सल्ला दिला आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

RBI Monetary Policy : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? अर्थतज्ज्ञांमध्ये मतभेद
Petrol Diesel Prices Today : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? वाचा तुमच्या शहरातील रेट्स