दिल्ली विमानतळावर अपघात पॅसेजच्या छताचा काही भाग अचानक वाहनांवर पडला, 6 जखमी

गुरुवारी दिल्ली विमानतळावर एक अपघात झाला. येथे गुरुवारी अचानक विमानतळावरील पॅसेजच्या छताचा काही भाग कोसळला. यादरम्यान छताला आधार देणारे लोखंडी बाजू व वरचे खांबही तुटून पडले. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

गुरुवारी दिल्ली विमानतळावर एक अपघात झाला. येथे गुरुवारी अचानक विमानतळावरील पॅसेजच्या छताचा काही भाग कोसळला. यादरम्यान छताला आधार देणारे लोखंडी बाजू व वरचे खांबही तुटून पडले. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहनावरील खांब पडल्याने वाहनाचेही पूर्ण नुकसान झाले. या घटनेने विमानतळावर एकच गोंधळ उडाला. जखमींना कसेबसे वाहनातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विमानतळ प्राधिकरणाने एक समिती स्थापन केली आहे.

विमानतळाच्या टर्मिनल-1 च्या पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये अपघात

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या पिकअप आणि ड्रॉप एरियामध्ये टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे कॅबसह अनेक वाहनांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागालाही घटनेची माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, टर्मिनल 1 बाजूच्या छताचे पत्रे आणि सपोर्ट बीम कोसळल्यामुळे प्रवाशांसाठी विमानतळ ड्रॉप आणि पिकअप क्षेत्रात हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे हा अपघात झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी माहिती घेतली

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनीही विमानतळ अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. ते म्हणाले की, दिल्ली विमानतळावर छत कोसळण्याच्या घटनेवर ते स्वतः लक्ष ठेवून आहेत. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्याबरोबरच जखमींवर चांगल्या उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दिल्लीत मुसळधार पावसामुळे छत कोसळल्याची चर्चा

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे छताचे पत्रे आणि सपोर्ट बीम तुटून पडल्याची चर्चा विमानतळावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Share this article