Ayodhya Ram Mandir: पाकिस्तानातून आला आवाज, 'मला अयोध्येला जायचंय!'; एका हिंदू व्यक्तीची पोस्ट व्हायरल

vivek panmand   | CMS
Published : Sep 15, 2026, 08:10 PM IST
ayodhya

सार

पाकिस्तानातील एका हिंदू व्यक्तीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्याचं आपलं स्वप्न असल्याचं त्याने म्हटलंय. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली असून, भारतीयांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

अयोध्येतील राम मंदिर! लाखो हिंदूंचं श्रद्धास्थान. आयुष्यात एकदा तरी अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं, असं प्रत्येक भक्ताला वाटतं. करोडो भारतीयांसाठी हे एक स्वप्न आहे. पण आता चक्क पाकिस्तानातून एका व्यक्तीने अयोध्येला येण्याचं स्वप्न पाहिलंय आणि सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, अनेक भारतीयांनी कमेंट्समधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानातील या व्यक्तीची इच्छा आहे की, आयुष्यात एकदा तरी अयोध्येला येऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं.

पोस्ट झाली प्रचंड व्हायरल

कैलाश माझिरान असं या पाकिस्तानी हिंदू व्यक्तीचं नाव आहे. त्याने आपल्या मनातली इच्छा सोशल मीडियावर मांडली आहे. आपल्या पोस्टमध्ये तो लिहितो, "मित्रांनो... माझे आई-वडील, पत्नी आणि मुलांसोबत भारतातील राम मंदिरात दर्शनासाठी येण्याचं माझं एक स्वप्न आहे." त्याची ही पोस्ट लोकांपर्यंत पोहोचताच प्रचंड व्हायरल झाली आणि अनेकांनी त्याचं कौतुकही केलं.

या पोस्टवर अनेक युझर्सनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, "या, तुमचं स्वागत आहे. राम सर्वांचे आहेत." तर दुसऱ्या एका युझरने लिहिलं, "अयोध्येला भेट देणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. ते नक्कीच पूर्ण होतं. तुमचं स्वप्नही नक्कीच पूर्ण होईल." आणखी एकाने लिहिलं, "पाकिस्तानमधून आलेल्या या संदेशाचा आम्ही नक्कीच आदर करतो. तुमची इच्छा पूर्ण होवो."

मिळालेल्या माहितीनुसार, कैलाश माझिरान हे पाकिस्तानातील हिंदू बहुसंख्य भागात राहतात. तिथल्या लोकांच्या हक्कांसाठी आणि परिस्थिती सुधारण्यासाठी ते संघर्ष करत आहेत. ते आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा