Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले जवान दिनेश कुमार कोण?

Published : May 08, 2025, 08:49 AM IST
Dinesh Kumar

सार

भारताने 07 मे ला ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने बुधवारी सीमारेषेवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये भारतीय सैन्यातील जवान दिनेश कुमार शहीद झाले.

Operation Sindoor : भारताने 07 मे ला ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने बुधवारी सीमारेषेवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये भारतीय सैन्यातील जवान दिनेश कुमार शहीद झाले. याबद्दलचे ट्विट हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी केले. पोस्टमध्ये सैनी यांनी लिहिले की, हरियाणाच्या जनतेला तुमचा अभिमान आहे.

खरंतर, दिनेश कुमार सीमारेषेवर गोळीबार सुरू असताना जखमी झाले होते. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु संध्याकाळी उशिरा उपचारावेळीच दिनेश कुमार यांचे निधन झाले. पुंछमधील कृष्णा घाटीत त्यांना तैनात करण्यात आले होते.

कोण होते दिनेश कुमार?

दिनेश कुमार शर्मा वर्ष 2024 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. 11 वर्षांच्या सेवेमध्ये दिनेश यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये काम केले. गोळीबारावेळी त्यांना पुंछमध्ये तैनात करण्यात आले होते. अलीकडेच दिनेश कुमार शर्मा यांना लान्स पद मिळाले होते.

PREV

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!