'आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, आजच शपथविधी व्हावा...', PM नरेंद्र मोदींच्या समर्थन प्रस्तावावर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

नितीश कुमार यांनी जेडीयूकडून नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान होण्यासाठी समर्थन देत म्हटले की, 10 वर्षांपासून ते पंतप्रधान आहेत. आता पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. याशिवाय नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची सेवा केली आहे.

Nitish Kumar Support to PM Modi : एनडीएच्या (NDA) संसदीय दलाच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेचे नेते, भाजपा आणि एनडीए संसदीय दलाचे नेते निवडण्यासाठीच्या प्रस्तावाला समर्थन दिले. यावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. याशिवाय विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही केला.

एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत नितीश कुमार यांनी म्हटले की, "आमचा पक्ष जेडीयू भाजपातील संसदीय दलाचे नेते नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी समर्थन देत आहे. अत्यंत आनंदाची बाब आहे की, 10 वर्षांपासून नरेंद्र मोदी पतंप्रधान राहिले आहेत. आता पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यांनी संपूर्ण देशाची सेवा केली. यावेळी जे काही शिल्लक राहिलेय ते पूर्ण करतील. आम्ही पूर्णपणे मोदींना पाठिंबा देऊ."

आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार- नितीश कुमार
नितीश कुमार यांनी पुढे म्हटले की, "पुढच्या वेळेस तुम्ही आल्यास काहीजण जे इथे-तिथे जिंकले आहेत, ते पुढे हरतील. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. बिहार आणि देश आता पुढे जात राहिल. आम्ही संपूर्णपणे जे तुम्हाला हवेय तसे समर्थन देऊ. आम्ही पूर्णपणे तुमच्यासोबत आहोत. माझा आग्रह आहे की, तुम्ही लवकरात लवकर काम सुरु करा. मी सर्व पक्षांचे अभिनंदन करतो."

दरम्यान, बिहारमधील सर्व राहिलेली कामे पूर्ण केली जातील. ही एक उत्तम बाब आहे आपण सर्वजण एकत्रित आहोत. आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी काम करणार आहोत. तुम्ही रविवारी पंतप्रधान पदाची शपथ घ्याल. पण मला वाटते की, आजच शपथविधी सोहळा व्हावा. तुम्ही जेव्हा कधी शपथ घ्याल तेव्हा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असू. आम्ही सर्व मिळून तुमच्यासोबत असू. तुमच्या नेतृत्वाखाली काम करू असेही नितीश कुमार यांनी म्हटले.

आणखी वाचा : 

'मी त्या शेतकरी समाजाची मुलगी आहे ज्याने मुघलांना त्यांच्या कबरीतून बाहेर काढून बदला घेतला', कुलविंदर कौर यांनी

आता लढाई राजकीय लढाई लोकसभेच्या पटलावर...सोनिया गांधींचा NDA आघाडीला थेट इशारा

Share this article