Nitin Gadkari Ethanol Car: नितीन गडकरींची मोठी घोषणा, ऑक्टोबरमध्ये येणार 100% इथेनॉलवर चालणारी कार

vivek panmand   | CMS
Published : Sep 27, 2026, 07:17 PM IST
Nitin Gadkari Ethanol Car: नितीन गडकरींची मोठी घोषणा, ऑक्टोबरमध्ये येणार 100% इथेनॉलवर चालणारी कार

सार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता एका नव्या क्रांतीच्या तयारीत आहेत. या नव्या कारला पेट्रोलची अजिबात गरज लागणार नाही, ती पूर्णपणे इथेनॉलवर धावेल. याचा खर्च प्रति लिटर फक्त २५ रुपये इतका असेल. ही कार ऑक्टोबरमध्ये लाँच होत आहे.

नवी दिल्ली (२७ सप्टेंबर): इथेनॉलच्या वापरावरुन सुरु असलेली चर्चा आता थांबण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतात एका नव्या क्रांतीसाठी सज्ज झाले आहेत. आता पेट्रोलची कटकट विसरा, कारण पुढच्या महिन्यात पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी कार बाजारात येत आहे. नितीन गडकरी पुढच्या महिन्यात 'टोयोटा फ्लेक्स फ्युएल इनोव्हा' (Toyota Flex Fuel Innova) कार लाँच करणार आहेत. विशेष म्हणजे या कारचा मेंटेनन्स खूपच सोपा असणार आहे. गडकरींनी सांगितलंय की, या कारला महागड्या पेट्रोलची गरज नाही, ती १०० टक्के इथेनॉलवर धावेल.

पुढच्या महिन्यापासून इथेनॉल कार

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी इथेनॉलवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की, सध्या भारतात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिक्स केलं जातंय. जगातले १९ पेक्षा जास्त देश अनेक वर्षांपासून इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल वापरत आहेत आणि तिथे कोणतीही अडचण आलेली नाही. भारतातही वाहनांमध्ये इथेनॉल वापरल्याने काहीही नुकसान होणार नाही, उलट यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येतील. सध्या २० टक्के इथेनॉल वापरलं जातंय, पण ऑक्टोबरमध्ये लाँच होणारी टोयोटा इनोव्हा फ्लेक्स फ्युएल कार १०० टक्के इथेनॉलवर धावेल, असं गडकरींनी स्पष्ट केलं.

इथेनॉल कारची खासियत

पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉल कारचा खर्च खूपच कमी असणार आहे. हा खर्च प्रति लिटर २५ रुपयांच्या आसपास असेल. एकीकडे पेट्रोलवर अवलंबून राहावं लागणार नाही आणि दुसरीकडे गाडीचा खर्चही वाचेल. पुढच्या महिन्यात येणारी इनोव्हा फ्लेक्स फ्युएल कार फक्त इथेनॉलवरच धावणार नाही, तर ती चालताना ६० टक्के वीजही तयार करेल. या विजेवर कारची बॅटरी, एसी आणि इतर गोष्टी चालतील, ज्यामुळे गाडीचं मायलेजही वाढेल.

भारतात इथेनॉल मिक्सिंगबद्दल अनेक गैरसमज आहेत. पण इथेनॉलमुळे गाड्यांचं नुकसान झाल्याची एकही अधिकृत तक्रार आलेली नाही. लवकरच अनेक ऑटोमोबाईल कंपन्या १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बनवणार आहेत. यामुळे भारताची पेट्रोलची गरज कमी होईल आणि इथेनॉलला जास्त महत्त्व मिळेल. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आणि पर्यावरणासाठीही चांगला असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Dog Attack: बंगळुरूत ५ महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लावर गोळीबार, संताप
Pankaja Munde | शेतकरी धाय मोकलून रडला, ताई 9-10 महिने कसे काढणार