Sonam Wangchuk: ज्ञानेश कुमार वादात सीजेपीच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा

vivek panmand   | CMS
Published : Sep 27, 2026, 06:48 PM IST
Sonam Wangchuk: ज्ञानेश कुमार वादात सीजेपीच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा

सार

समाजसेवक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी पुन्हा एकदा सीजेपीच्या (CJP) आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. याआधी नीट (NEET) घोटाळ्याविरोधात जंतरमंतरवर त्यांनी उपोषण केलं होतं. आता मुद्दा वेगळा असला तरी ते पुन्हा कॉकरोच जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी पुन्हा एकदा सीजेपीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीजेपीने केलेल्या आंदोलनावेळी त्यांनी जंतरमंतरवर उपोषण केलं होतं. आता विषय वेगळा आहे, पण ते पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. सीजेपीचे नेते अभिजीत डिपके यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं की, मुख्य निवडणूक आयुक्तांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला नाही, तर ते मोठं आंदोलन छेडतील. महात्मा गांधी यांची जयंती म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सीजेपी रस्त्यावर उतरणार आहे. या आंदोलनाची सुरुवात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून होणार आह

ज्ञानेश कुमार वादात सीजेपीच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा

या आंदोलनाला आता सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला आहे. यावर बोलताना ते म्हणाले, "देशाला सध्या एका पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची सर्वात जास्त गरज आहे. त्यामुळे माझ्याकडून या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणं मला शक्य नसलं, तरी मी सुरुवातीपासूनच अशा मोहिमांना माझा पाठिंबा देत आलो आहे." थोडक्यात सांगायचं तर, पर्यावरणवादी सोनम वांगचुक पुन्हा एकदा कॉकरोचच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

नेमकं काय म्हणाले वांगचुक?

सध्या एसआयआर (SIR) आणि इतर अनेक मुद्द्यांवरून निवडणूक आयुक्तांमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातच एक स्फोटक अहवाल समोर आलाय. विरोधी पक्षांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर भाजपसाठी मतं चोरल्याचा गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॉकरोच जनता पार्टीने इशारा दिलाय. निवडणूक आयोगाच्या कारभारातील विसंगती आणि अनैतिक कामांचे अनेक आरोप समोर येत आहेत. त्यामुळेच येत्या २ ऑक्टोबरपासून आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं कॉकरोच पार्टीने स्पष्ट केलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Dhananjay Munde | बीड जिल्ह्यात शेतकरी कोलमडला, धनंजय मुंडे यांची गंभीर भविष्यवाणी
Ashok Singhal: अशोक सिंघल यांच्यामुळेच अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं: पंतप्रधान मोदी