नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह घेणार घटस्फोट? रोहनने सांगितले खरे कारण

Published : Apr 08, 2024, 04:40 PM ISTUpdated : Apr 08, 2024, 04:44 PM IST
Neha kakkar and rohanpreet singh

सार

नेहा कक्कर घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियामधून दिसत आहेत. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी 2020 मध्ये लग्न केले होते.

नेहा कक्कर घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियामधून दिसत आहेत. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांनी 2020 मध्ये लग्न केले होते. या दोघांच्या नात्यात कटुता आली असून ते घटस्फोट घेणार असल्याची बातमी प्रसार माध्यमांमधून झळकताना आपण पहिली असेल. पण अचानक नेमकं असं काय झालं, की दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला तेच जाणून घेणार आहोत. 

रोहनप्रीत सिंह घटस्फोटाच्या चर्चेवर काय म्हणाले? 
रोहनप्रीत सिंह यांनी बोलताना नेहा आणि माझ्यात एकमेकांची साथ निभावणे लिहून ठेवलं आहे असं म्हटलं आहे. आम्ही दोघे एका म्युझिक अल्बमसाठी भेटलो आणि त्यानंतर आमच्यात प्रेम झाल्याची माहिती रोहन यांनी दिली आहे. मैत्रीत जवळीक वाढल्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर चार वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केले. 

रोहनप्रीत सिंह नेहाबद्दल काय म्हणतात? - 
"माझ्यासोबत घडलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो. बाकी अफवांकडे मी फारसं लक्ष देत नाही. जर गॉसिप केल्याने काही लोकांना आनंद मिळत असेल तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे" असंही रोहनप्रीत यांनी बोलताना सांगितलं आहे. नेहा आणि मी एकमेकांसोबत खुश आहोत. आम्ही आमचं काम आणि आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. मी जेव्हा नेहाकडे पाहतो तेव्हा मला याची जाणीव होते की ती किती नम्र आहे. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं." 

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!