उन्हाळी सुट्यांमध्ये आपण कुठं जाऊ शकता फिरायला? भारतातील शांत प्रवासाची ठिकाण घ्या जाणून

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला कुठे जायचं हा दरवेळी प्रश्न पर्यटकाला पडत असतो. अशावेळी आपण कुठे फिरायला जाऊ शकतो याची माहिती आपल्याला असायला हवी.

vivek panmand | Published : Apr 8, 2024 7:46 AM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला कुठे जायचं हा दरवेळी प्रश्न पर्यटकाला पडत असतो. अशावेळी आपण कुठे फिरायला जाऊ शकतो याची माहिती आपल्याला असायला हवी. त्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरत येतील अशा ठिकाणांची यादी तुम्हाला माहिती असायला हवी. तर तीच यादी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

१. आगत्ती बेट - 
आगत्ती बेत हे स्वच्छतेसाठी  निळ्याशार पाण्यासाठी खासकरून प्रसिद्ध आहे. हे बेट शहरापासून लांब निवांत वसलेलं आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत असते. येथे विविध प्रकारचे मासे, कोरल्स आणि कासवांची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. येथे शांत आणि निवांत वेळ घालवण्यासाठी आपल्याला पर्यटन करायला जाण्याची संधी आहे. 

२. आलेप्पी बेट - 
आपण आलेप्पी येथे जाऊन उन्हाळ्यातील काही चांगला काळ व्यतीत करू शकता. येथे गेल्यानंतर आपल्याला आलेप्पी बॅक वॉटर येथे बोट हाऊसचा आनंद घेता येऊ शकतो. आपण बोट हाऊसमधून संपूर्ण बॅक वॉटरमधून राईड मारून येऊ शकता आणि येथे येऊन निवांत वेळ घालवता येऊ शकतो. आपण बाहेर कुठे जायचा विचार करत असाल तर हा पर्याय सर्वात चांगला आहे. 

३. हंपी - 
आपण हंपी येथे जाऊन चांगला वेळ घालवू शकता. हंपीमध्ये जाऊन आपल्याला इतिहासातील महत्वाच्या घडामोडी समजून घेता येतील. जागतिक वारसा स्थळांपैकी एक ओळख असलेलं हंपी हे ठिकाण कमी काळात प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. यामुळे साहसी आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी आपण हंपीला आवर्जून भेट द्यायला हवी. 

४. ऋषिकेश - 
हिमालयाच्या कुशीत वसलेलं ऋषिकेश हे सर्वात मोठ्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते.  जगातील योगाची राजधानी म्हणून ऋषिकेशची खऱ्या अर्थाने ओळख आहे. येथे खासकरून योग आणि अध्यात्मासाठी पर्यटक येतात आणि  शांती घेऊन निघून जातात. 
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 व्या शतकातील Vikasit Bharat ची केली होती भविष्यवाणी, वर्ष 1999 मधील व्हिडीओ व्हायरल (Watch)

Share this article