रशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल व्लादिमवीर पुतीन यांचे नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक, संपर्कात राहण्याचे केले मान्य

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी व्लादिमवीर पुतीन यांची निवड झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

vivek panmand | Published : Mar 20, 2024 10:46 AM IST

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी व्लादिमवीर पुतीन यांची निवड झाल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पुतीन यांच्या निवडीबद्दल मोदी यांनी स्वागत केल्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील परराष्ट्र संबंध वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे

भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी यामुळे आणखी मजबूत व्हायला मदत मिळणार आहे. द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला जाणार आहे.

रशिया-युक्रेन संघर्षात पुढे जाण्याचा मार्ग म्हणून पंतप्रधानांनी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा पुनरुच्चार केला आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी फोनवरून संभाषण केले. श्री व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी त्यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण लोकांच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आगामी काळात दोन्ही देशांमधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.त्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांमधील प्रगतीचाही आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला.

रशिया-युक्रेन संघर्षावर चर्चा करताना, पंतप्रधानांनी पुढील मार्ग म्हणून संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूने भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.यावेळी दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहण्याचे मान्य केले.
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या
IPL 2024: IPL सामने कधी आणि कुठे दिसणार, सर्व माहिती घ्या जाणून

Share this article