फर्स्ट एसी कुपे बनली ‘हनीमून सूट’; व्हायरल व्हिडीओनंतर रेल्वेची मोठी कारवाई

Published : Jul 09, 2026, 08:35 AM IST
Nandigram Express

सार

नांदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी कुपेमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एसी कुपेला हनीमून सूटसारखे सजवल्याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे.  

मुंबई : भारतीय रेल्वेकडून नांदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसी डब्यातील खासगी कुपेमधील (दोन जणांसाठी दिलेली रुम) एक व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे रेल्वे प्रशासनाकडून टीसीचे निलंबन करण्यात आले आहे. नक्की काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया.

‘हनीमून सूट’मध्ये रूपांतर

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रेन क्रमांक 11002 नांदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट एसीमधील खासगी कुपे आकर्षक पद्धतीने सजवलेली दिसत आहे. कुपेमध्ये फुगे, फुलांच्या सजावटीसह हजारो गुलाबाच्या पाकळ्या पसरवण्यात आल्या होत्या. तसेच भिंतीवर "I Love You" असा मेसेजही होता. अशा आलिशान सजावटीमुळे अनेकांनी या कुपेची तुलना थेट ‘हनीमून सूट’शी केली. ट्रेन प्रवासादरम्यानच ही सजावट पाहून प्रवासी आणि सोशल मीडियातील युजर्सच्या भुवया उंचावल्या गेल्यात.

सजावटीसाठी खासगी डेकोरेटरची नियुक्ती

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी प्रवास करणाऱ्या एका जोडप्याने ऑनलाइन पद्धतीने एका खासगी डेकोरेटला बोलावले होते. याच्याकडून त्यांच्या फर्स्ट एसी कुपेचे डेकोरेशन करुन घेण्यात आले होते. जालना रेल्वे स्थानकात संबंधित डेकोरेटर ट्रेनमध्ये चढला. या डेकोरेटरला अनधिकृतपणे डेकोरेशनसाठी परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. खरंतर ही बाब गंभीर असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टीसी निलंबित

या प्रकरणी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण घटनेची सखोल विभागीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. चौकशी अहवालानुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

डेकोरेटरवरही रेल्वे कायद्यानुसार गुन्हा

रेल्वे प्रशासनाने संबंधित डेकोरेटरविरोधातही कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत परवानगीशिवाय ट्रेनमध्ये प्रवेश करणे, तिकीटाशिवाय प्रवास करणे आणि रेल्वे परिसरात अनधिकृत घुसखोरी करणे असे आरोप लावण्यात आले आहेत. डेकोरेटच्या विरोधात रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियात युजर्सच्या प्रतिक्रिया

ट्रेनच्या कोचमधील व्हिडीओ पाहून सोशल मीडियातील युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. काही युजर्सने डेकोरेशनची सजावट पाहून कौतूक केले. पण दुसऱ्या बाजूला अनेकांनी रेल्वेच्या कोचमध्ये हनीमून सूटसारखे डेकोरेशन करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला आहे. अशी सजावट करण्यासाठी कोणी परवानगी दिली. नियमांचे उल्लंघन झाले असल्याचेही काही युजर्सने म्हटले.

सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त

या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. फुगे, सजावटीचे साहित्य, फुले आणि इतर सजावटीच्या वस्तूंमुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. असेही अनेक युजर्सने म्हटले. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असे डेकोरशन करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. यावर आवश्यक ती कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रासह २३ राज्यात होणार मुसळधार पाऊस, या भागात रेड अलर्ट केला जारी
Eknath Shinde यांचा झाडांचे ऑडिट, हलगर्जी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा | TreeAudit | Monsoon | Safety