महाराष्ट्रासह २३ राज्यात होणार मुसळधार पाऊस, या भागात रेड अलर्ट केला जारी

Published : Jul 08, 2026, 11:37 PM IST
Belagavi Flood Rain

सार

महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, हवामान विभागाने ९ जुलै रोजी मोठा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसह सुमारे २३ राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आता हवामान विभागाने ९ जुलै रोजी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. आयएमडीने सांगितलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, मध्य प्रदेशसह सुमारे २३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस होणार? 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बिहार, ओडिसा आणि उत्तर प्रदेशमध्ये पाऊस पडणार आहे. उत्तर प्रदेशसोबत अनेक राज्यांमध्ये ४० ते ५०किमी, तर काही ठिकाणी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहू शकतात. पश्चिम बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस अतिवृष्टी होणार असून १३ जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज सांगितलाय.

उत्तर भारतात अतिवृष्टी होणार 

उत्तर भारतात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस होऊ शकतो. मध्य प्रदेशात काही ठिकाणी ९ जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व मध्य प्रदेश भागात ९ आणि १० जुलै या तारखेला अतिवृष्टी होऊ शकते. झारखंडमध्ये काही भागात मुसळधार पाऊस होणार असून १२ जुलैपर्यंत रेड अलर्ट सांगितलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, २४ वा हप्ता खात्यात कधी येणार?
Bihar Boat Tragedy: बिहारमध्ये गंगेत बोट उलटली, १३ निष्पाप मुलांचा मृत्यू