मुकेश आणि नीता अंबानी यांनी सून राधिकाला लग्नाआधी दिले हे महागडे गिफ्ट, किंमत ऐकून व्हाल थक्क

Published : Feb 22, 2024, 03:55 PM ISTUpdated : Feb 22, 2024, 04:01 PM IST
Radhika marchant

सार

राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा यंदाच्या वर्षाच्या अखेरीस पार पडणार आहे. अशातच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या होणाऱ्या सूनेला खास गिफ्ट दिले आहे.

Radhika Marchant and Anant Ambani Wedding : रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आणि देशातील सर्वाधिक मोठे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी याचा लवकरच विवाह सोहळा पार पडणार आहे. अनंत अंबानीचे लग्न राधिका मर्चेंट सोबत होणार आहे. या रॉयल विवाहासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच अंबानी परिवाराने होणाऱ्या सूनेला खास गिफ्ट दिले आहे. राधिला आलिशान कारसह अन्य काही गिफ्ट्स देण्यात आले आहेत.

राधिकाला 4.5 कोटी रुपयांची कार गिफ्ट
राधिका मर्चेंटला लग्नाआधीच सासू-सासऱ्यांनी गिफ्ट देण्यास सुरुवात केली आहे. राधिकाला Bentley Continental GTC Speed Car गिफ्ट करण्यात आली आहे. या कारची किंमत तब्बल 4.5 कोटी रुपये आहे.

नीता अंबानींनी दिले खास गिफ्ट
नीता अंबानी (Nita Ambani) यांनी सूनेला खास गिफ्ट दिले आहे. राधिकाला त्यांनी चांदीचा गणपती आणि लक्ष्मीचे गिफ्ट दिले आहे.

काही सेलिब्रेटींकडेच आहे आलिशान कार
राधिकाला अंबानी परिवाराने दिलेली आलिशान कार काही निवडक सेलिब्रेटींकडेच आहे. यामध्ये विराट कोहली, आमिर खान, अभिषेक बच्चन यांची नावे आहेत. या कारमध्ये ट्विन टर्बोचार्ज्ड 6.0 लीटर W12 इंजिन दिले गेले आहे. याशिवाय कार केवळ 3.6 सेकंदामध्ये 0-60 मैल प्रति तास वेगाने धावते.

आणखी वाचा : 

PM Modi Visit Gujarat : डबल इंजिन सरकारचा फायदा घेत गुजरात दुग्ध व्यवसायात पुढे, पंतप्रधानांनी अहमदाबादमधील सोहळ्यात मांडले हे मुद्दे

जिलेबी तळण्याची ही पद्धत पाहून व्हाल अव्वाक, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO

कॉटन कँडीमुळे आरोग्याला कॅन्सरचा धोका, पद्दुचेरीनंतर तमिळनाडू सरकारने घातली विक्रीवर बंदी

PREV

Recommended Stories

आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!