Dawood Ibrahim : मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेबाबत मोठा निर्णय, या दिवशी होणार लिलाव

भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबई आणि रत्नागिरीतील संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. भाजपा सरकार 5 जानेवारी 2024 रोजी या संपत्तीचा लिलाव करणार आहे.

Dawood Ibrahim Property : भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे. दाऊद इब्राहिमची मुंबई आणि रत्नागिरीमध्ये मालमत्ता आहेत, या संपत्तीचा भाजपा सरकार लिलाव करणार आहे. 

दाऊदच्या मालमत्तेचा फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अ‍ॅक्ट अंतर्गत लिलाव करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मालमत्तेत एक बंगला आणि रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये आंब्याच्या बागेचा समावेश आहे, याच संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त समोर आले होते.

दाऊद इब्राहिमवर विष प्रयोगाचा प्रयत्न

अलिकडेच सोशल मीडियापासून ते प्रसिद्धी माध्यमांमध्येही अंडरवर्ल्ड डॉन व भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मृत्यूचे वृत्त पसरले होते. दाऊदवर जेवणातून विष प्रयोग करण्यात आला होता. यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कराचीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण या घटनेत तो बचावला नाही. 

दुसरीकडे या संदर्भात पाकिस्तान सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तर छोटा शकीलनेही दाऊद जिवंत असल्याचे सांगितले.

पाकिस्तानमध्ये लपलाय दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिम काही दशकांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे. पण ही बाब पाकिस्तानकडून कायम नाकारण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाहीच, त्यामुळे त्याच्यावर कराचीत उपचार कसे होणार? आणि पाकिस्तानात त्याला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न कसा होऊ शकतो? दरम्यान पाकिस्तानी माध्यमांमध्ये दाऊद इब्राहिमच्या मृत्यूबाबतच्या बातम्याही प्रसारित करण्यात आल्या नाहीत. आता या वृत्तांदरम्यानच दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी सुरू झाली आहे.

आणखी वाचा :

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम पूर्णपणे ठणठणीत, छोटा शकीलचा दावा

महिलेच्या डोळ्यातून काढले 60 जिवंत किडे, डॉक्टरांनाही बसला धक्का

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजीच का? जाणून घ्या कारण

Share this article