
उत्तर प्रदेशातील मथुरेत एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. इथे दोन नवरदेवांना त्यांच्या मेहुण्याने चक्क १-१ कोटी रुपयांचे नोटांचे हार भेट दिले आहेत. ५०० रुपयांच्या नोटांनी बनवलेल्या या भव्य हारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय.
मथुरा जिल्ह्यातील सुरीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नगला फौंदा गावातील प्रशांत सिंग आणि कान्हा राघव या दोन तरुणांचं लग्न होतं. लग्नाच्या आधी होणाऱ्या 'घुरचढी' (घोड्यावरून काढली जाणारी वरात) कार्यक्रमादरम्यान त्यांना हे अनोखं सरप्राईझ मिळालं.
या दोन्ही नवरदेवांना त्यांचा मेहुणा योगेश कुमार ठाकूर याने हे खास गिफ्ट दिलं आहे. योगेश हा मूळचा राजस्थानच्या कामन इथला राहणारा आहे. त्यानेच प्रत्येकी एक कोटी रुपयांचे हे हार खास तयार करून घेतल्याची माहिती आहे.
हे पण वाचा : GTA 6 : फ्री पैसे, शस्त्रं आणि कार कशा मिळवायच्या? हे घ्या ६१ चीट कोड्स!
हे हार म्हणजे काही साधे फुलांचे हार नाहीत. तर प्रत्येक हार तब्बल १०० फूट लांब असून तो ५०० रुपयांच्या नव्याकोऱ्या नोटांनी गुंफलेला आहे. एका हाराची किंमत १ कोटी रुपये सांगण्यात येत आहे. म्हणजेच दोन हारांची एकूण किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे.
या हारांची लांबी आणि वजन इतकं जास्त होतं की, ते नवरदेवांच्या गळ्यात घालण्यासाठी बऱ्याच लोकांची मदत घ्यावी लागली. इतकंच नाही, तर नवरदेवांना घराच्या छतावर उभं करून मगच त्यांना हे हार घालता आले.
प्रशांत सिंग आणि कान्हा राघव हे योगेंद्र सिंग आणि कुशलपाल सिंग यांची मुलं आहेत. हे दोघेही शेतकरी नेते महावीर स्वामी यांचे नातेवाईक असून, त्यांचा मार्बल आणि दगडांचा मोठा व्यवसाय आहे.
या दोघांचा विवाह सोहळा गोवर्धन भागातील एका मंगल कार्यालयात पार पडला. वरातीत नवरदेवांना घातलेले हे भव्य हार पाहून नातेवाईक आणि गावकऱ्यांचेही डोळे दीपले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. आता हेच व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून, मेहुण्याने दिलेल्या या हटके गिफ्टची सर्वत्र चर्चा आहे.
हे पण वाचा : House : स्विमिंग पूल असलेलं घर बांधायला किती खर्च येतो? स्वस्तात कसं बांधायचं?
या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्रत्येक हारात १ कोटी रुपयांच्या ५०० च्या नोटा असल्याचा दावा केला जात असला तरी, या रकमेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या हारांच्या खऱ्या किमतीबाबत काहींनी शंकाही व्यक्त केली आहे. तरीही, दोन नवरदेवांच्या गळ्यातील १०० फूट लांब नोटांच्या हारांनी मथुरेसह संपूर्ण इंटरनेटचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हे पण वाचा : Mixer Grinder : भारतीय स्वयंपाकासाठी बेस्ट ५ मिक्सर ग्राइंडर! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स