
घरी परतण्याचा प्रवास एका मुलासाठी अत्यंत वेदनादायी ठरला. स्पाइसजेटच्या विमानाला झालेल्या विलंबामुळे हा प्रवासी विमानतळावरच ढसाढसा रडला. विमान कंपनीचा ढिसाळ कारभार आणि बेजबाबदारपणावर संताप व्यक्त करत, या प्रवाशाने आपला संताप एका व्हिडिओत मांडला आहे.
होय, तुम्ही बरोबर वाचलंत. दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे (DUSU) अध्यक्ष यश डबास यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक तरुण विमान कंपनीचे कर्मचारी आणि इतर स्टाफसमोर रडताना आणि विनवणी करताना दिसतोय. "माझे वडील वारलेत, मला त्यांच्याकडे जायचंय (Mera papa dead kar gaya, mere papa ke jana chahta)," असं म्हणत तो गयावया करत होता.
"एका मुलाला त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहोचता येत नाहीये. तुम्ही एवढं मोठं पाप तुमच्या डोक्यावर का घेत आहात?" असं म्हणत व्हिडिओच्या ॲडमिनने प्रवाशाच्या या अवस्थेवर संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, या गोंधळात विमानतळावरील इतर सर्व प्रवासी एकत्र आले आणि त्यांनी "स्पाइसजेट, थोडी लाज बाळगा (SpiceJet sharam karo)" अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिलंय, "@spicejetairlines प्रवाशांना अशा मनस्तापातून जावे लागणे अत्यंत लाजिरवाणे आहे. वडिलांच्या निधनानंतर घरी पोहोचण्यासाठी धडपडणारा एक दुःखी मुलगा विमानाला झालेल्या विलंबामुळे अडकून पडलाय. जबाबदारी घ्या. थोडी तरी माणुसकी आणि उत्तरदायित्व दाखवा."
एका युजरने लिहिलंय, "भावा, तुला बळ मिळो (More power to u brother)."
दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, "हे अत्यंत लाजिरवाणे आहे (This is shameful)."
आणखी एकाने कमेंट केली, "हे लोक माझा रिफंड पण देत नाहीयेत (Refund bhi nahi de rhe mera)."