दिल्लीतील गाझीपुर डंपिंग ग्राऊंडला भीषण आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल; जाणून घ्या सध्याची स्थिती

Fire in Ghazipur Landfill Site: दिल्लीतील गाझीपूरमधील डंपिंग ग्राउंडला रविवारी (21 एप्रिल) संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Chanda Mandavkar | Published : Apr 22, 2024 2:43 AM IST / Updated: Apr 22 2024, 08:22 AM IST

Fire in Ghazipur Landfill Site : दिल्लीतील गाझीपूर येथील डंपिंग ग्राउंडला (Dumping Ground) रविवारी (21 एप्रिल) भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेबद्दल अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले की, आग उष्ण तापमान आणि तेथून निघणाऱ्या गॅसमुळे लागली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीच्या धुराचे लोट सातत्याने बाहेर पडत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यांनी म्हटले की,आम्हाला रविवारी संध्याकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी आग लागल्याची सूचना मिळाली. सुरूवातीला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या रवाना झाल्या. त्यानंतर सहा गाड्यांना घटनास्थळी पाठवण्यात आल्या. 

आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू
अग्निशमन दलानुसार, सध्या डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम केले जात आहे. एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, आग विझवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. आम्ही सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहोत. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून तेथील रस्ते स्वच्छ केले आहेत. जेणेकरून अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्याच्या कार्यात अडथळा येऊ नये.

भाजपाचा दिल्ली सरकारवर हल्लाबोल
भाजपाने (BJP) दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपने म्हटले की, सरकारने गेल्या वर्षात 31 डिसेंबरपर्यंत गाझीपुर डंपिंग ग्राऊंड रिकामे करू असे आश्वासन दिले होते. पण आपले आश्वासन पाळले नाही. दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर (Pravin Shankar Kumar) यांनी म्हटले की, डंपिंग ग्राऊंडला आग लागल्याने धुराचे मोठे लोट बाहेर पडत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांसह व्यावसायिकांना मोठा त्रास होतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी वर्ष 2022 च्या महापालिकेच्या निवडणुकीआधी 31 डिसेंबर, 2023 पर्यंत डंपिंग ग्राऊंड रिकामे करण्याचे आश्वासन दिले होतो. या ठिकाणचा कचरा हटवण्याचे काम करण्याएवजी तेथे अधिक कचरा वेळोवेळी टाकण्यात आला असेही प्रवीण कपूर यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा : 

NIA चा मोठा खुलासा ! रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचे धागेदोरे पाकिस्तानमध्ये ?

Lok Sabha Elecion 2024: मतदानाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारामुळे मणिपूर मधील 11 केंद्रांवर फेर मतदान; वाचा केव्हा आणि कधी होणार मतदान

Share this article