Viral Video: नदीत गळ टाकला अन् बाहेर आला शेकडो नाण्यांचा खजिना, पाहा व्हिडीओ

vivek panmand   | CMS
Published : Sep 04, 2026, 10:15 PM IST
viral video

सार

एका डिजिटल क्रिएटरचा मॅग्नेट फिशिंगचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. नदीत मॅग्नेट टाकल्यावर त्याला भंगार नाही, तर चक्क शेकडो नाण्यांचा खजिना सापडला. हा प्रकार पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर एका डिजिटल क्रिएटरचा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. या पठ्ठ्याने नदीत मॅग्नेट फिशिंग करायचं ठरवलं. पाण्याखाली काहीतरी भारी सापडेल या आशेने त्याने एक मोठं आणि पॉवरफूल मॅग्नेट पाण्यात टाकलं. या घटनेचा व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

जेव्हा त्याने मॅग्नेट बाहेर काढायला सुरुवात केली, तेव्हा त्याला ते खूप जड लागलं. सुरुवातीला त्याला वाटलं की भंगारचा एखादा मोठा तुकडा लागला असेल. पण जेव्हा मॅग्नेट पाण्याबाहेर आलं, तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्या मॅग्नेटला शेकडो नाणी चिकटली होती. सामान्य मॅग्नेट फिशिंगमध्ये एवढा मोठा खजिना सापडणं ही खरंच मोठी गोष्ट आहे.

व्हायरल व्हिडीओ: बिहारमध्ये खाटेवर फणा काढून बसलेल्या नागाची लोकांनी केली पूजा! (पाहा)

हा व्हिडीओ ऑनलाइन येताच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. हा प्रकार पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. काहींनी याला 'नशिबाचा खेळ' म्हटलं, तर काहींना प्रश्न पडलाय की इतकी सगळी नाणी नदीच्या तळाशी आली तरी कशी?

मॅग्नेट फिशिंग हा प्रकार ऑनलाइन क्रिएटर्स आणि खजिना शोधणाऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. यात लोक मोठं मॅग्नेट वापरून नदी, तलाव किंवा विहिरींमधून धातूच्या वस्तू शोधतात. यामध्ये कधी रोजच्या वापरातून फेकलेल्या वस्तू सापडतात, तर कधी अनेक वर्षांपासून पाण्याखाली दडलेल्या विचित्र गोष्टीही हाती लागतात.

या क्रिएटरला मिळालेल्या यशामुळे आता अनेक लोकांना मॅग्नेट फिशिंग करून पाहण्याची इच्छा झाली आहे. सध्या तरी, ही शेकडो नाणी नदीत कशी आली, याचं गूढ कायम आहे आणि त्यामुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Passport vs Visa : परदेशवारीचं प्लॅनिंग करताय? मग पासपोर्ट आणि व्हिसामधला फरक नक्की समजून घ्या
Raj Thackeray | बाळासाहेबांना न आवडणारे संजय राऊत सामनाचे संपादक कसे झाले? राज ठाकरे Sanjay Raut