ठाणे न्यायालयाने 2008 रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. राज ठाकरे न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी हजर झाले होते. भाषणांच्या कथित सीडींसह कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने सर्व आरोपींना दिलासा दिला.