London Style Double Decker Bus Service Starts In Bengaluru : बंगळूरुसाठी लंडनच्या धर्तीवर 'अंबारी डबल डेकर' बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसेस लालबाग, विधानसौध यांसारख्या प्रमुख पर्यटन स्थळांना जोडतील, महामंडळाच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करता येईल.
राजधानी बंगळूरला येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाने लंडनच्या धर्तीवर 'अंबारी डबल डेकर' बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
24
आजपासूनच बससेवा सुरू
आजपासून तीन डबल डेकर बसेस बुधवारपासून धावण्यास सुरुवात करतील. यापूर्वी बंगळूरला येणाऱ्या पर्यटकांसाठी बीएमटीसीने डबल डेकर बससेवा सुरू केली होती. मात्र, आर्थिक तोट्यामुळे कालांतराने ही बससेवा बंद करण्यात आली होती.
34
कोणत्या मार्गांवर धावणार?
आता केएसटीडीसीने बंगळूरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी लंडनच्या धर्तीवर तीन डबल डेकर बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस लालबाग, कब्बन पार्क, विधानसौध, के.आर. मार्केट, टिपू सुलतान समर पॅलेस यासह शहरातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांच्या मार्गावरून धावतील.
पर्यटकांना महामंडळाच्या वेबसाइटवरून शहराच्या दौऱ्यासाठी आगाऊ ऑनलाइन बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तिकीटाची किंमत १८० रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही बस सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत धावेल.