Lok Sabha Election 2024 : मोफत रेशन योजना, महिला सक्षमीकरण भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने?वाचा सविस्तर

निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.वाचा सविस्तर

Ankita Kothare | Published : Apr 14, 2024 5:40 AM IST / Updated: Apr 14 2024, 11:11 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहे. विकसित भारत ते देशात एक निवडणूक, आर्थिक प्रगती, आयुष्मान भारत योजनेचा विस्तार, ३ कोटी घरे, मोफत वीज, पर्यटन विकास या सारख्या अनेक घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.

तरुणांसाठी स्टार्टअप अन् गुंतवणूक :

तरुणांसाठी गुंतवणूक, पायाभूत सुविधा, स्टार्टअप, क्रीडा, उच्च मूल्य सेवा आणि पर्यटनाचे नवीन मार्ग खुले होतील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल:

भाजपने आपल्या ठराव पत्रात आयुष्मान भारत योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत मिळतील असे आश्वासन दिले आहे. भविष्यातही ही योजना सुरू राहणार आहे. पारदर्शक परीक्षेमुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाईल. प्रत्येक नागरिकाला चांगले शिक्षण दिले जाईल.

७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला मोफत उपचार :

७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला, मग तो गरीब असो वा मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय. त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार असल्याचे देखील यात नमूद केले आहे.

वीज बिल शून्य करणार :

वीज बिल शून्यावर आणण्यासाठी पंतप्रधान सूर्यघर बिलजी योजना सुरू करण्यात येणार आहे. घरात मोफत वीज, तसेच अतिरिक्त विजेचे पैसेही दिले जाणार आहे.

मुद्रा योजनेची मर्यादा २० लाख :

मुद्रा योजनेची मर्यादा १० लाखांवरून २० लाख रुपये करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल. तृतीय पंथियांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत.

कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या : 

आणखी वाचा:

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोदरम्यान दगडफेक, डोक्याला दुखापत

 

Read more Articles on
Share this article