इराणने इस्राइलवर केला हल्ला, सॅटेलाईट आणि ड्रोनने केला जाणार बंदोबस्त

इराणने शनिवारी इस्राइलवर पहिला हल्ला केला आहे. स्फोटक ड्रोन आणि सॅटेलाईटने हल्ला केला आहे.

इराणने शनिवारी इस्राइलवर पहिला हल्ला केला आहे. स्फोटक ड्रोन आणि सॅटेलाईटने हल्ला केला आहे. इस्राइलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार इराणने इस्राइलच्या दिशेने स्फोटके घेऊन जाणारे 100 ड्रोन उडवले. इराणने केलेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इस्राइल सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इस्राइलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी बोलताना सांगितलं की, “आम्ही इस्राइल लोकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. इराणकडून येणाऱ्या सॅटेलाईट हल्यांवर लक्ष ठेवून असून लोकांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”

इराण इस्राइलवर का हल्ला करत आहे? 
इस्राइलने इराणच्या दूतावासावर केलेल्या हवाई हल्यात बदला घेण्याची धमकी दिली आहे. त्यामध्ये दोन उच्च पदस्थ इराणी जनरलसह 12लोकांचा मृत्यू झाला आहे. तेहरानने या हल्ल्याला इस्रायली गुन्ह्यांचा बदल म्हणून हा हल्ला करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. इस्राइली राजवटीने आणखी एक चूक केली असून इराणची प्रतिक्रिया खूप तीव्र राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

इस्राइल, लेबनॉन आणि इराकने त्यांची हवाई क्षेत्रे बंद केली आहेत. तर सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षणाला हाय अलर्टवर ठेवले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराणने इस्राइलकडे जात असताना अमेरिकन सैन्याने काही ड्रोन हल्ले यशस्वीरीत्या रोखले आहेत. भारताच्या फ्लाईट इराणमधून जात नाहीत ते दुसरीकडून वळून जात आहेत. त्यामुळे युरोपमध्ये जाताना दोन तास उशीर होत आहेत. त्यामुळे भारताच्या फ्लाईटला उशीर होत असल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहेत. 
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : मोफत रेशन योजना, महिला सक्षमीकरण भाजपच्या जाहीरनाम्यात नेमकी कोणती आश्वासने?वाचा सविस्तर
इराणने इस्राइलवर केला हल्ला, सॅटेलाईट आणि ड्रोनने केला जाणार बंदोबस्त

Share this article