Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमके काय सांगितले? वाचा सविस्तर..
Lok Sabha Elections 2024 : देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका या वर्षी एप्रिल ते मे महिन्यादरम्यान होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारी संदर्भात पाठवलेल्या पत्रामध्ये मतदानाची तात्पुरती तारीख नमूद करण्यात आली आहे.
हे पत्र समोर आल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखेची माहिती व्हायरल होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्या तारखेला निवडणुका होणार आहेत? याबाबत स्वतः मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती स्पष्ट केली आहे.
निवडणुकीच्या तारखेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी नेमके काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली. “तयारीस अंतिम स्वरूप देता यावे, याकरिता तात्पुरती तारीख निश्चित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी मतदानाच्या तारीखेची केवळ संदर्भासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणुकीची अंतिम तारीख किंवा कोणत्याही प्रकारची घोषणा नाही”, असे मुख्य निवडणूक अधिकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
सीईओ दिल्ली कार्यालयाच्या (CEO Delhi office) ट्विटर हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “निवडणुकीच्या तारखांबाबत मीडियामध्ये अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. पण निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, तर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आपल्या आदेशामध्ये नमूद केलेली तात्पुरती तारीख ही केवळ निवडणुकीच्या तयारीसाठी आहे.”
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना (DEOs) पाठवलेल्या पत्रामध्ये लोकसभा निवडणुकीची संभाव्य तारीख नमूद केली होती. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (CEO) कार्यालयाने जारी केलेल्या या पत्रात म्हटले गेले आहे की, "आयोगाने केवळ निवडणुकीच्या नियोजनासंदर्भासाठी 16 एप्रिल 2024 ही मतदानाची तात्पुरती तारीख म्हणून नोंद केली आहे".
यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखेची माहिती व्हायरल होऊ लागल्याने निवडणूक आयोगाने याबाबतचा खुलासा केला.
आणखी वाचा
Ayodhya Ram Mandir : प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी, पहाटेच्या पहिल्या आरतीचा पाहा VIDEO
Ram Mandir : हिरे-माणिक यासारख्या रत्नांनी सजलेली रामललांची मूर्ती