लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतीनच उमेदवारांची पाचवी यादी जारी केली आहे. या यादीमध्ये भाजपने नेत्यांसह कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय बंडखोर आमदारांपासून दूर राहण्याची भूमिका पाचव्या यादीत भाजपने घेतल्याचे दिसून आले.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपने नुकतीच आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडखोर आमदारांना दूर ठेवत कलाकार आणि नेत्यांना तिकीट दिले आहे. जाणून घेऊया भाजपच्या पाचव्या यादीतील पाच बड्या गोष्टींबद्दल सविस्तर...
भाजपची पाचवी यादी जाहीर
भाजपने पाचव्या यादीत 111 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीमध्ये कंगना राणौत, अरुण गोविल, नवीन जिंदल, सीता सोरेन यांच्यासह काही बड्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपुर, पक्षाचे प्रवक्ता संबित पात्रांना ओडिसातील पुरी येथून तिकीट दिले आहे. उत्तर प्रदेशातील सुल्तानपुर येथून मेनका गांधी, पीलीभीत येथून वरुण गांधी यांचे तिकीट कापून जितिन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. झारखंड येथून दुमका जागेवरून माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची वहिनी सीता सोरेन यांना तिकीट दिले आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांचे उत्तर कन्नड येथून तिकीट कापले आहे.
याशिवाय रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांना मेरठ लोकसभेच्या जागेवरुन तिकीट दिले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे आणि वीके सिंह यांच्याशिवाय खासदार वरुण गांधी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. हिमाचलमधील मंडी जागेवरुन कंगना राणौत निवडणूक लढणार आहे. भाजपने आतापर्यंत 402 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
वरुण गांधी यांचा पत्ता कट
उत्तर प्रदेशाबद्दल बोलायचे झाल्यास भाजपने पाचव्या उमेदवारांच्या यादीत येथील 13 आणखी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. याआधी 51 उमेदवार आणि आता 13 उमेदवार असे मिळून 64 नावांची घोषणा करण्यात आली आहे. मित्रपक्षांसोबत जागा वाटप केल्यानंतर भाजप स्वत: निवडणुकीच्या 75 जागांवर निवडणूक लढणार आहे. पक्षाने पीलीभीत येथून वरुण गांधी यांचा पत्ता कट केा आहे. बाराबंकी येथील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. भाजपने मेनका गांधी यांना सुल्तानपुर येथून पुन्हा तिकीट दिलेय. याशिवार मेरठ येथून अरुण गोविल निवडणूक लढणार आहेत.
भाजपने सहारनपुर येथून राघव लखनपाल, मुरदाबाद येथून सर्वैश सिंह, गाजियाबाद येथून अतुल गर्ग, अलीगढ येथून सतीश गौतम, हाथरस येथून अनूप वाल्मीकी, बदाऊ येथून दुर्विजय सिंह शाक्य, बरेली येथून छत्रपाल सिंह गंगवार, सुल्तानपुर येथून मेनका गांधी, कानपुर येथून रमेश अवस्थी, बाराबंकी येथून राजरानी रावत, बहराईच येथून अरविंद गोंड निवडणूक लढणार आहेत.
आंध्र प्रदेशातील जागांसाठी उतरवले उमेदवार
भाजपने आंध्र प्रदेशातील सहा जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजप-टीडीपी-जेएसपी युतीत ठरला आहे. भाजपन प्रदेश अध्यक्ष पुरंदरेश्वरी यांना राजमुंदरी येथून तिकीट दिले आहे. कोथापल्ली गीता यांना अराकू, मुख्यमंत्री रमेश यांना अनाकापल्ले, माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांना राजमपेट येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात के. सुरेंद्रन
भाजपने केरळातील वायनाड जागेवरून राहुल गांधी आणि सीपीआयचे एनी राजा यांच्या विरोधात प्रदेश अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, सुरेंद्रन यांनी आधी कथित रुपात यंदा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. भाजपने केरळातील चार जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये कोल्लम जागेवरुन अभिनेते कृष्णकुमार यांना तिकीट दिलेय. याशिवाय एर्नाकुलम येथून केएस राधाकृष्णन आणि अलाथुर जागेवरून डॉ. टीएन सरसु यांचा पत्ता कट केला आहे.
गुजरात येथून या उमेदवारांना दिलीय संधी
भाजपने गुजरात येथून 26 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. जूनागढ येथून विद्यमान खासदार राजेश चुडासमा यांना पुन्हा तिकीट दिले आहे. याशिवाय वडोदरा येथून डॉ. हेमंग जोशी यांचा पत्ता कट केलाय. पक्षाने साबरकांठा येथून शोभाबेन बरैया, मेहसाणा येथून हरिभाई पटेल, सुरेंद्रनगर येथून चंदूभाई शिहोरा आणि अमरेली येथून भरतभाई सुतारिया यांना तिकीट दिले आहे. पक्षाने गुजरातच्या सहा जागांसाठी आपल्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलेय.
माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांना दिलेय तिकीट
कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांना भाजपने पश्चिम बंगालमधील तमलुक जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कृष्णानगर येथून राजमाता अमृता रॉय यांची टक्कर टीएमसी नेत्या महुत्रा मोइत्रा यांच्यासोबत होणार आहे. तृणमूल काँग्रेसमधून पुन्हा भाजपात आलेले अर्जुन सिंह बैरकपुर येथून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपचे बंगालमधील माजी अध्यक्ष आणि मिदनापुर खासदार दिलीप घोष वर्धमान-दुर्गापूर जागेवर लढणार आहेत. आसनसोल येथून आमदार अग्निमित्र पॉल मेदिनीपुर, बशीरहाट येथून संदेशखळी प्रकरणातील पीडिता रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे.
बिहारमध्ये अश्विनी चौबे यांचा पत्ता
बिहार येथून भाजपने 17 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यंदाच्या वेळी बक्सर येथून खासदार अश्विनी चौबे यांचा पत्ता कट केला आहे. नवाडा येथून वरिष्ठ नेते डॉ. सीपी ठाकुर यांचा मुलगा आणि राज्यसभा खादार विवेक ठाकुर यांना तिकीट दिले आहे. बेगूसराय येथून गिरिराज सिंह, बक्सर येथून मिथिलेश तिवारी, सासाराम येथून छेदी पासवान यांचा पत्ता कट केला आहे. पासवान एवजी शिवेश राम यांना उमेदवारी भाजपने दिली आहे. मुजफ्फरपुर येथून अजय निषाद यांचा पत्ता कट करत राज भूषण निषाद यांना तिकीट दिले आहे.
आणखी वाचा :
Loksabha Election 2024 : भाजपने उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, अभिनेत्री राधिकाला मिळाले तिकीट