भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जारी केली आहे. या स्टार प्रचारकांकडून वेगवेगळ्या निवडणूक जागांच्या येथे भाजपच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) स्टार प्रचारकांच्या नावाची घोषणा केली आहे. या नावाच्या यादीत 40 स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली आहे. यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda), केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Dr. Mohan Yadav) यांच्यासह वीडी शर्मा (VD Sharma) यांच्या नावाचा समावेश आहे. या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील लोकसभेच्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या निवडणूक क्षेत्रात भाजपकडून निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत.
स्टार प्रचारकांच्या यादीत मुख्य नेत्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना देखील मध्य प्रदेशातील लोकसभेच्या जागेवर निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार कॅम्पेनरच्या यादीत जागा दिली आहे. याशिवाय काँग्रेसमधून भाजपात आलेले सुरेश पाचौरी यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
मध्य प्रदेशात उमा भारती आणि प्रज्ञा सिंह ठाकुर यांना वगळले
मध्य प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि प्रज्ञा सिंह ठाकुर यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. यादीत मध्य प्रदेशातील दिग्गज नेत्यांना स्थान दिले आहे. मध्य प्रदेशातील भाजपचे अध्यक्ष वी. डी. शर्मा, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, दुसरे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्यासह भूपेंद्र पटेल यांना स्टार प्रचारकांच्या यादीत जागा दिली आहे.
याशिवाय मध्य प्रदेशातील केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, फग्गन सिंह कुलस्ते, वीरेंद्र कुमार खटीक, प्रल्हाद पटेल, हितानंद, कैलाश विजयवर्गीय, राकेश सिंह, जयभान सिंह पवैया, नारायण कुशवाह, लाल सिंह आर्य, निर्मला भूरिया, तुलसी सिलावट, एदल सिंह कंसाना, गोपाल भार्गव, नरोत्तम मिश्रा, कविता पाटीदार, गौरीशंकर बिसेनसारख्या नेत्यांना यादीत स्थान दिले आहे.
मध्य प्रदेशात चार टप्प्यात होणार निवडणूक
मध्य प्रदेशात चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी आठ जागांसाठी होणार आहे. याशिवाय चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. सर्व टप्प्यातील मतदानाचे निकाल 4 जून रोजी समोर येणार आहेत.
आणखी वाचा :
Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची सहावी यादी केली जाहीर