अभिनेता शेखर सुमनची भाजपात एण्ट्री, काँग्रेसच्या तिकीटावर वर्ष 2009 मध्ये लढवली होती निवडणूक

Published : May 07, 2024, 12:55 PM ISTUpdated : May 07, 2024, 01:31 PM IST
Shekhar Suman Rekha Intimate Scene Utsav

सार

Shekhar Suman Joins BJP : अभिनेता शेखर सुमन याने भाजपात एण्ट्री केली आहे. वर्ष 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब येथून निवडणूक लढवली होती.

Lok Sabha Election 2024 : बिहारच्या राजकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता शेखर सुमन (Actor Shekhar Suman) याने भाजपात (BJP) एण्ट्री केली आहे. ऐन लोकसभेच्या निवडणुकीवेळी शेखर सुमन यांचे भाजपात जाणे इंडिया आघाडीला (INDIA Alliance) मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. वर्ष 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब येथून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शेखर सुमन यांचा पराभव झाला होता. मंगळवारी (07 मे) शेखर सुमन यांनी दिल्लीतील भाजप पक्षाच्या मुख्यालयात सदस्यता घेतली.

काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती
शेखर सुमन यांनी दुसऱ्यांदा राजकरणात एण्ट्री करत भाजपाचे कमळ हाती घेतले आहे. याआधी काँग्रेसच्या तिकीटावरून शेखर सुमन यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. वर्ष 2009 मध्ये पटना साहिब जागेवरून निवडणूक लढवली होती. पण भाजपाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी शेखर सुमन यांचा पराभव केला होता.

शेखर सुमन यांची प्रतिक्रिया
भाजपात सहभागी झाल्यांतर शेखर सुमन यांनी म्हटले की, "कालपर्यंत मला माहिती नव्हते आज मी येथे असेन. आयुष्यातील काही गोष्टी अज्ञातपणे होत राहतात. मी येथे सकारात्मक विचाराने आलो आहे. देवाचे आभार मानतो की, त्याने मला येथे येण्याचा आदेश दिला आणि भाजपात आलो."

काँग्रेसच्या राधिका खेरांचीही भाजपात एण्ट्री
काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया समन्वयक राधिका खेरा (Radhika Khera) यांनी देखील भाजपात एण्ट्री केली आहे. यानंतर राधिका खेरा यांनी म्हटले की, "मी नेहमीच ऐकलेय काँग्रेस राम विरोधी, सनातन विरोधी आणि हिंदू विरोधी आहे. पण मी कधीच यावर विश्वास केला नाही. महात्मा गांधीजी प्रत्येक बैठकीची सुरुवात 'रघपुति राघव राजा राम' पासून करतात. मला सत्य अशावेळी कळले जेव्हा माझ्या आजीसोबत राम मंदिरात जाऊन आल्यानंतर माझ्या घराच्या दरवाज्यावर जय श्री रामचा झेंडा लावलेला दिसला. यानंतरच काँग्रेसमध्ये माझा तिरस्कार होऊ लागला. याशिवाय झेंडाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले तेव्हाही पक्षाने राग व्यक्त करत निवडणुकीच्या काळात अयोध्येत का गेली असा सवाल विचारला?"

आणखी वाचा : 

'उच्च जातीने पेपर ठरवल्यास दलित परीक्षेत नापास होतात', राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरील युजर्स संतप्त (Watch Video)

अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी निधी घेतल्याचा आरोप, नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी एनआयएकडे तपासाची केली शिफारस

PREV

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!