Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या, 7 मे ला अमित शाह, सुप्रिया सुळेंसह 'या' दिग्गज नेत्यांचे भवितव्य होणार मतपेटीत बंद

Published : May 06, 2024, 08:08 AM ISTUpdated : May 06, 2024, 02:13 PM IST
Lok Sabha Election 2024 3rd Phase Candidates

सार

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी प्रचार तोफा थंडावल्या असून बड्या नेत्यांचे भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…

3rd Phase Candidate :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्यांमधील 94 संसदेच्या जागांवर 7 मे ला मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, प्रल्हाद जोशी, सुप्रीया सुळेंसह अन्य बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

अमित शाह (गांधीनगर)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याआधी गांधीनगरचे प्रतिनिधित्व लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होते. वर्ष 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत अमित शाह यांनी काँग्रेसचे उमेदवार सीजे चावडा यांचा पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेसच्या सोनल पटेल निवडणूक लढवणार आहेत.

डिंपल यादव (मैनपुरी, उत्तर प्रदेश)
तीन वेळा खासदार आणि समाजवादी पक्षाच्या प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथून निवडणूक लढवत आहेत. डिंपल यादव यांनी सासरे मुलायम यादव यांच्या मृत्यूनंतर वर्ष 2022 मध्ये पोटनिवडणूकीत विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत डिंपल यादव यांच्या विरोधात भाजपाचे मंत्री जयवीर सिंह आणि बहुजन समाज पक्षाचे नेते शिव प्रसाद यांच्यासोबत होणार आहे.

सुनेत्रा पवार (बारामती)
बारामती महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत.

सुप्रिया सुळे (बारामती)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी वर्ष 2006 मध्ये राज्यसभेच्या सदस्याच्या रुपात राजकरणात एण्ट्री केली. वर्ष 2009 मध्ये सुप्रिया सुळे सातत्याने लोकसभा निवडणूक जिंकत आल्या आहेत. सुप्रिया सुळेंच्या शपथपत्रात त्यांनी एकूण संपत्ती 166.5 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले आहे. वर्ष 2019 मध्ये सु्प्रिया सुळेंची संपत्ती 127.8 कोटी रुपये होती. सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामतीत सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया (गुना, मध्य प्रदेश)
ग्वालियर-चंबल क्षेत्रातील गुना मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस नेते राव यादवेंद्र सिंह यांच्यामध्ये लढत होणार आहे. वर्ष 2019 मध्ये भाजपा उमेदवार कृष्ण पाल सिंह यांनी सिंधियांच्या विरोधात विजय मिळवला होता.

शिवराज सिंह चौहान (विदिशा, मध्य प्रदेश)
पाचवेळा खासदार राहिलेले शिवराज सिंह चौहान यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रताप भानु शर्मा निवडणूक लढवणार आहेत.

बीवाय राघवेंद्र (शिवमोग्गा, कर्नाटक)
भाजपाने खासदार बीवाय राघवेंद्र यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने गीता शिवराजकुमार यांना तिकीट दिले आहे. राघवेंद्र कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बीएश येडियुरप्पा यांचे पुत्र आहेत. राघवेंद्र तीन वेळा शिवमोग्गा येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि वर्ष 2018 च्या पोटनिवडणुकीत राघवेंद्र यांनी गीता शिवराजकुमार यांचा भाऊ मधु बंगारप्पा यांचा पराभव केला होता.

प्रल्हाद जोशी (धारवाड, कर्नाटक)
धारवाड मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसकडून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी वर्ष 2004 पासून सातत्याने चार वेळा निवडणूक जिंकले आहेत. प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात काँग्रेसचे ओबीसी नेते विनोद आसुती निवडणूक लढवत आहेत.

दिग्विजय सिंह (राजगड, मध्य प्रदेश)
मध्यप्रदेशातील राजगड येथून भाजपाने रोडमल नागर आणि काँग्रेसने दिग्विजय सिंह यांना निवडणुकीसाठी तिकीट दिले आहे. वर्ष 2019 मध्ये रोडमल नागर यांनी काँग्रेस उमेदवार मोना सुस्तानी यांचा पराभव केला होता.

श्रीपद नाइक (उत्तर गोवा)
भाजपाचे उमेदवार श्रीपद नाइक पाचवेळा खासदार राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत श्रीपद नाइक यांची लढत काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्यासोबत होणार आहे.

आणखी वाचा : 

असदुद्दीन ओवैसींविरुद्ध लढणाऱ्या माधवी लता किती श्रीमंत ?

अखेर निर्णय झालाच! रायबरेलीतून राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात, वाचा काँग्रेसने अमेठीतून कोणाला दिली उमेदवारी

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!