Published : Apr 30, 2025, 09:48 AM ISTUpdated : May 01, 2025, 12:07 AM IST

30 April 2025 Live Updates: HBD MH : रक्तरंजित संघर्षानंतर ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा झाला जन्म, वाचा अंगावर काटा आणणारा इतिहास

सार

30 एप्रिल 2025 च्या मुंबई, महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढवा घेण्यासाठी वाचत रहा आमचे लाइव्ह अपडेट्स…

12:07 AM (IST) May 01

HBD MH : रक्तरंजित संघर्षानंतर ६५ वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा झाला जन्म, वाचा अंगावर काटा आणणारा इतिहास

मुंबई ः १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी त्यावेळी वेगवेगळी राज्ये उदयाला आली नव्हती. प्रचंड संघर्ष आणि रक्तरंजित लढ्यानंतर एकसंध महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

Read Full Story

11:17 PM (IST) Apr 30

जीआय-पीकेएल २०२५: पुरुषांचा किताब मराठी व्हल्चर्सनी जिंकला

गुरुग्राममध्ये बुधवारी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात मराठी व्हल्चर्सनी तमिळ लायन्सला ४०-३० असा पराभव करून जीआय-पीकेएल २०२५ पुरुषांचा किताब जिंकला.

Read Full Story

11:11 PM (IST) Apr 30

पाकिस्तानी विमानांना भारताच्या हवाईक्षेत्रात प्रवेशबंदी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने ३० एप्रिल ते २३ मेपर्यंत पाकिस्तानी विमानांना आपल्या हवाईक्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये लष्करी आणि नागरी दोन्ही प्रकारच्या विमानांचा समावेश आहे.

Read Full Story

09:23 PM (IST) Apr 30

पुणे ग्रामीण भागातील टॉरेंट गॅसच्या पंपांवर १ मे पासून सीएनजी विक्री बंद

पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनने १ मे २०२५ पासून पुणे ग्रामीण भागातील टॉरेंट गॅसद्वारे संचालित पंपांवर CNG विक्री स्थगित करण्याची घोषणा केली आहे. अनियमित पुरवठा आणि सततच्या खंडामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Full Story

08:02 PM (IST) Apr 30

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Read Full Story

06:29 PM (IST) Apr 30

प. बंगालमधील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ, ५५०० रुपये जमा होणार

पश्चिम बंगालमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता (Dearness allowance) मध्ये मोठी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा एकदा भत्ता वाढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जी सरकारने घेतला आहे. ५५०० रुपये खात्यात जमा होणार आहेत.

Read Full Story

06:23 PM (IST) Apr 30

या तारखांना जन्मलेली मुले बेस्ट भाऊ असतात, जाणून घ्या अंकशास्त्रातील रहस्य

काही तारखांना जन्मलेले मुले केवळ स्वतःच्या आयुष्याबद्दलच नव्हे तर त्यांच्या भावंडांबद्दलही विचार करतात. त्यामुळे त्यांना 'दि बेस्ट ब्रदर' हा पुरस्कार दिला जाऊ शकतो.

Read Full Story

04:56 PM (IST) Apr 30

इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमधून सूट... नोंदणी शुल्कातही सवलत; महाराष्ट्राच्या नव्या EV धोरणात मोठी घोषणाः 2025 पर्यंत लागू

महाराष्ट्र सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरण 2025 जाहीर केले आहे, ज्यामध्ये निवडक महामार्गांवर टोल सूट, नवीन वाहनांच्या नोंदणीवर सवलत आणि इतर फायदे समाविष्ट आहेत.

Read Full Story

04:50 PM (IST) Apr 30

पुढील जनगणनेत जातीनिहाय सर्वेक्षण केले जाणार, केंद्र सरकारचा निर्णय

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीने आगामी जनगणना जातीनिहाय करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Full Story

04:40 PM (IST) Apr 30

PM मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्याला जाणार नाहीत, हे आहे कारण

विजय दिन सोहळा: पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या विजय दिन सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. क्रेमलिनच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे. मात्र, अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read Full Story

04:06 PM (IST) Apr 30

कॉर्पोरेट जग सोडून शेतीत यशाचं फळ, समीर डोंबे यांची ‘अंजीर’ गाथा!

Sameer Dombe Story: नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या समीर डोंबे यांनी 'पावित्रक' ब्रँड अंतर्गत अंजीराची शेती करून यशाची नवी व्याख्या लिहिली. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या धोरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कोविड काळात १३ लाखांची उलाढाल केली.

Read Full Story

03:51 PM (IST) Apr 30

पाकिस्तानशी लढा, भारतातील सामान्य लोकांशी नाही : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राकांपा) ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांच्या मृत्युवर शोक व्यक्त करताना सांगितले की, आपला लढा पाकिस्तानविरुद्ध आहे, भारतातील सामान्य जनतेविरुद्ध नाही. 

Read Full Story

03:34 PM (IST) Apr 30

नागपूरच्या भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार राज्याच्या ताब्यात, ४७ लाखांत विकत घेत ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रात परत

महाराष्ट्र सरकारने लंडनच्या लिलावातून रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार ४७.१५ लाख रुपयांना खरेदी केली. छत्रपती शाहू महाराजांनी बहाल केलेल्या सेनासाहिबसुभा या उपाधीने सन्मानित रघुजी भोसले यांच्या शौर्याची ही तलवार आता महाराष्ट्रात परतली आहे.
Read Full Story

03:14 PM (IST) Apr 30

उन्हाळ्यात केसांसाठी दही लावण्याचे फायदे जाणून घ्या

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखी, कोंडा आणि केसगळतीवर दही एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. दहीतील थंडावा आणि प्रोबायोटिक गुणधर्म टाळू शांत ठेवतात आणि कोंडा कमी करतात.

Read Full Story

02:01 PM (IST) Apr 30

जपानमधील भारतीय समुदायाने पहलगाम हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

Pahalgam Terror Attack : जपानमधील टोकियो येथील भारतीय दूतावास आणि भारतीय समुदायाने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली.

Read Full Story

01:03 PM (IST) Apr 30

फडणवीसांचे विश्वासू देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदाचा दर्जा डीजीपी रॅन्कचा समजला जातो.

Read Full Story

12:16 PM (IST) Apr 30

पहलगाम हल्ल्यानंतर 24 तासांत लष्करी कारवाई करायची होती -संजय राऊत

Sanjay Raut on Pahalgam Terror Attack : संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राउत यांनी असेही म्हटले की, पंतप्रधानांनी शाहांचा राजीनामा घ्यावा.

Read Full Story

11:56 AM (IST) Apr 30

महाबळेश्वरमध्ये पायलट प्रोजेक्टसह पर्यटन सुरक्षा दल सुरु करणार

महाबळेश्वर पर्यटन महोत्सवादरम्यान २५ 'पर्यटन मित्रां'चे सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे. पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि मार्गदर्शन करणे हा यामागचा उद्देश आहे.
Read Full Story

11:11 AM (IST) Apr 30

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर निवृत्त, कोण होणार नवीन पोलिस आयुक्त..

मुंबई ः भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज (दि. ३०) निवृत्त झाले. सुमारे तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. त्यांच्यानंतर कोण मुंबईचे पोलिस आयुक्त होणार, याची चर्चा सुरु झाली आहे. 

Read Full Story

10:38 AM (IST) Apr 30

नौपाडा येथील ठाकरे गटातील नेत्यांना शिंदेसेनेत प्रवेश

ठाणे शहरातील नौपाडा विभागातील उबाठा गटाच्या  २० पदाधिकाऱ्यांनी आज (दि. ३०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंदआश्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

Read Full Story

10:35 AM (IST) Apr 30

परवीन बाबी विवाहित होती, तिचा नवरा पाकिस्तानला गेला; महेश भट यांनी केला दावा

महेश भट्ट यांनी परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल आणि तिच्या गुप्त लग्नाबद्दल खुलासा केला आहे. त्यांना त्यांच्या नात्यादरम्यान तिच्या लग्नाबद्दल कळले आणि नंतर पाकिस्तानात तिच्या पतीला भेटण्याची संधी हुकली.
Read Full Story

10:10 AM (IST) Apr 30

तमिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यातील मुथंडीपुरम गावातील फटाक्याच्या गोदामाला आग

तमिळनाडूमधील विरुधुनगर जिल्ह्यातील मुथंडीपुरम गावातील फटाक्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. 

 

 

09:49 AM (IST) Apr 30

श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर स्लॅब घटनेसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडून आर्थिक मदत जाहीर

सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराचा स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याने आँध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबाला 25 लाख तर जखमींच्या कुटुंबाला 3 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.