एक षटक संपल्यानंतर दोघेही मैदानाबाहेर जात असताना कोहलीने कॉन्स्टासच्या खांद्यावर थाप मारली.
मेलबर्न: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील बॉक्सिंग डे कसोटी सुरू असतानाच १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात ६५ चेंडूत ६० धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केल्यानंतर तो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर बाद झाला. कॉन्स्टासने भारतीय गोलंदाजांना चांगलाच धो धो दिला. बुमराहच्या एका षटकात त्याने १८ धावा काढल्या.
त्या षटकात त्याने एक षटकार, दोन चौकार आणि दोन दुहेरी धावा केल्या. कसोटीत बुमराहच्या ४,४८३ चेंडूंनंतर षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी बुमराहने ४,४८३ चेंडूंमध्ये एकही षटकार दिला नव्हता. दरम्यान, विराट कोहली आणि कॉन्स्टास यांच्यात वाद झाला. एक षटक संपल्यानंतर दोघेही मैदानाबाहेर जात असताना कोहलीने कॉन्स्टासच्या खांद्यावर थाप मारली. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक चकमक झाली. व्हिडिओ पहा...
यापूर्वी, भारत मेलबर्नमध्ये दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरला. शुभमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळाले. तसेच, भारतीय कर्णधार रोहित शर्माने डाव उघडला. गिलच्या जागी के. एल. राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ऑस्ट्रेलियाने आपला संघ आधीच जाहीर केला होता. १९ वर्षीय सॅम कॉन्स्टासने पदार्पण केले, तर स्कॉट बोलंडलाही संघात स्थान मिळाले. नॅथन मॅक्सवेलच्या जागी कॉन्स्टास आला, तर जखमी जोश हेजलवूडच्या जागी बोलंड खेळला. दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे.
ऑस्ट्रेलिया: उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलंड.
भारत: यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.