
मुंबई : देशात आज (26 जुलै) 26 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस भारताच्या इतिहासात गौरवाते प्रतीक बनला आहे. या दिवशी जेव्हा वर्ष 1999 मध्ये भारतीय सैन्याने कारगिल युद्ध जिंकले होते. याच निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अन्य राजकीय नेते, लष्करप्रमुख यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ट्विट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर कारगिल विजय दिनानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, “कारगिल विजय दिनानिमित्त, मातृभूमीसाठी आपले बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. हा दिवस आपल्या सैनिकांच्या असाधारण शौर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. राष्ट्रासाठी त्यांचे समर्पण आणि सर्वोच्च बलिदान देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहील.जय हिंद! भारताचा विजय!”
कारगिलच्या जवानांना श्रद्धांजली वाहताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले की, कारगिल विजय दिवस भारतीय सैन्यासाठी अद्वितीय साहस, धैर्य आणि अतूट संकल्पाचे प्रतीक आहे. या गौरवपूर्ण दिवसानिमित्त आम्ही त्या वीरांना नमन करतो ज्यांच्या पराक्रमामुळे हा ऐतिहासिक विजय झाला. भारतीय सैन्य राष्ट्राची संप्रभूता आणि स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी नेहमीच प्रतिबद्ध आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील जवानांना श्रद्धांजली वाहत म्हटले की, “देशवासीयांना कारगिल विजय दिवसाच्या खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्याला त्या वीर सपूतांच्या अप्रतिम साहस आणि शौर्याची आठवण करुन देतो, ज्यांनी आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले. मातृभूमीसाठी आयुष्य वाहण्याचे त्यांचे सामर्थ्य प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहिल.”
अमित शाह यांचे ट्विट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्विट
केंद्रीय क्रिडा मंत्री मनसुख मांडविया, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उद्या लद्दाखमधील कारगिल जिल्ह्यातील द्रास येथे आयोजित करण्यात आलेल्या कारगिल विजय दिवसानिमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या दरम्यान सैन्याकडून तीन महत्वाचे प्रोजेक्ट्स लाँच केले जातील.