कंगना राणावत यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज, त्यांची विक्रमादित्य सिंग यांच्याशी होणार तुल्यबळ लढत

Published : May 14, 2024, 03:13 PM ISTUpdated : May 14, 2024, 03:14 PM IST
Ranaut filed nomination

सार

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा सामना काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्याशी होणार असून ही लढत तुल्यबळ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

मंगळवारी हिमाचल प्रदेश येथील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार कंगना राणावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कंगना यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला जात असताना रोड शो करून मोठे शक्तिप्रदर्शन केले. कंगना राणावत यांच्या रोड शोला मंडी लोकसभा मतदारसंघातील लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कंगना राणावत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंडीतील लोकांचा माझ्यावर विश्वास असून त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. लोकांच्या आशा आणि अपेक्षेमुळे मी येथून निवडणुकीला उभी राहिली आहे. आज मी मंडी येथील लोकसभेच्या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केला असून येथे प्रत्येकजण उत्साही आहे. मी भाजपकडून मला उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंदी आहे. 

कंगनाची लढाई काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्यासोबत - 
भाजप उमेदवार कंगना राणावतची लढाई काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंग यांच्यासोबत होणार आहे. येथे सातव्या टप्यात सर्वात शेवटी मतदान होणार असून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह या येथून विद्यमान खासदार आहेत. त्यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंग हे कंगना राणावत यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. प्रतिभा या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाल्या असून विक्रमादित्य सिंग हे विजयासाठी प्रयत्न करणार आहेत. 

2019 मध्ये भाजपचे राम स्वरूप शर्मा विजयी झाले होते -
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे राम स्वरूप शर्मा हे मंडीत विजयी झाले होते. त्यांना 6,47,189 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार आश्रय शर्मा यांना 2,41,730 मते मिळाली. अशा प्रकारे राम स्वरूप 4,05,459 मतांच्या फरकाने विजयी झाले. मंडईतील मतदारांची एकूण संख्या 913148 होती. 73.6 टक्के मतदारांनी मतदान केले.
आणखी वाचा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल, तिसऱ्यांदा खासदार होऊन बनणार देशाचे पंतप्रधान
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, कर्करोगामुळे लोकसभा निवडणूक प्रचारापासून होते दूर

PREV

Recommended Stories

IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!