पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल, तिसऱ्यांदा खासदार होऊन बनणार देशाचे पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते निवडून आल्यास तिसऱ्यांदा वाराणसी शहराचे लोकप्रतिनिधित्व करतील. भाजपकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवारही आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी येथून 2014 ला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, यावर्षी ते हॅट्रिक म्हणून निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित होते. 

पंतप्रधान मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दशवमेध घाटावर प्रार्थना करून आरती केली. त्यानंतर काल भैरव मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली आणि उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान उमेदवार असून पंतप्रधान पदाचे सलग तिसऱ्यांदा प्रबळ दावेदार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कोणाची लढत? - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वाराणसी येथून काँग्रेस पक्षाकडून अजय राय आणि बसपाचे अथर अली लारी यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. येथून मागील नरेंद्र मोदी यांच्या लढतींचा अभ्यास केल्यास 2019 च्या निवडणुकीत मोदींनी जवळपास 4.8 लाख मतांनी  आणि 2014 मध्ये 3.72 लाख मतांनी विजय मिळवला होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती लीड राहील, याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 

कॉमेडियन शाम रंगीला लढणार पंतप्रधानांच्या विरोधात - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीला निवडणूक लढवणार असून त्याने याबाबतची घोषणा केली आहे. पण त्याने अजून उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे नेमकं काय होत ते पाहावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी शहराला भेट दिल्यानंतर म्हटले की, "माझे वाराणसी शहराशी अद्वितीय आणि अतुलनीय असे नाते आहे. मी एवढेच म्हणेल की हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यांनी काल भैरव मंदिराला भेट देण्याच्या आधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ही माहिती दिली होती. 
आणखी वाचा - 
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, कर्करोगामुळे लोकसभा निवडणूक प्रचारापासून होते दूर
राज्यात नवीन कोविड सबवेरियंट 'FLiRT' च्या आढळल्या 91 केसेस

Share this article