Crime : पटनामध्ये जेडीयू पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. सौरभ कुमार असे नेत्याचे नाव असून लग्नसमारंभावरून परतताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
Crime in Bihar : बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथे जेडीयू पक्षाचा नेता सौरभ कुमार याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. लग्नसमारंभावरून घरी परतताना गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
जेडीयूमधील तरुण आणि सक्रिय नेता
नीतीश कुमार यांचा पक्षा जनता दल यूनाइटेडचा तरुण नेता असलेला सौरभ कुमार नेहमीच पक्षाच्या कार्यात सक्रिय असायचा. बुधवारी संध्याकाळी आपला मित्र मुनमुनसोबत एका लग्नसोहळ्यासाठी गेला होता. येथून परत येताना पुनपुन परिसरात बाइकवरून आलेल्या चार जणांनी सौरभवर गोळीबार केला. सौरभच्या मित्रालाही तीन गोळ्या लाल्या आहेत. यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले असता सौरभचा तेथे मृत्यू झाला.
लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने घेतली पीडित कुटुंबाची भेट
सौरभची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. याशिवाय सौरभवर करण्यात आलेल्या गोळीबारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती पुनपुन येथे पोहोचत तिने सौरभच्या कुटुंबाची भेट घेतली. आरोपींना कठोर शिक्षा होईल असेही मीसाने म्हटले.
26 एप्रिलला मतदान
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होणार आहे. त्याआधी जेडीयू नेत्याची हत्या झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हत्या करणारे कोण होते, जुना कोणता वाद होता किंवा राजकरणाशी याचा काही संबंध आहे का? अशा सर्व दृष्टीकोनातून पोलिसांचे विशेष पथक घटनेचा तपास करत आहेत. आरोपींचाही शोध घेतला जातोय. शिवाय आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी करण्यासह सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जात आहेत.
आणखी वाचा :
मुकेश दलाल झाले बिनविरोध खासदार, त्यांच्या विजयामागे कोणाचा हात