भाजपच्या मुकेश दलाल यांनी मतदान होण्याच्या आधीच खासदार होण्याचा मान मिळवला आहे. सुरतमधून ते बिनविरोध निवडून आले आहेत.
काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा फॉर्म रद्द करण्यात आला, त्यानंतर अपक्ष उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहेत.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर खासदार म्हणून निवड करण्यात आली. येथील मतदान हे 7 मे रोजी पार पडणार होते.
भारतात आतापर्यंत 30 पेक्षा जास्त वेळा अशा निवडी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे पहिल्यांदाच झालेलं नाही.