Jaish e Mohammed : गुप्तचर सूत्रांनी इशारा दिला आहे की महिला विंगचा वापर 'मानसिक युद्ध आणि भरती'साठी केला जाईल. हा भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो. महिलांच्या माध्यमातून छुपे युद्ध लढण्यावर ही संघटना भर देत आहे.
JeM ची पहिली महिला ब्रिगेड, भारतासाठी धोक्याची घंटा!
पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने (JeM) आपली पहिली महिला ब्रिगेड तयार केली आहे. या टीमला 'जमात अल-मुमिनात' असे नाव दिले आहे. याची भरती सुरू झाली आहे.
24
मसूद अझरच्या बहिणीकडे महिला ब्रिगेडची कमान
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये JeM चे मुख्यालय उद्ध्वस्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. महिलांची भरती, हेरगिरी आणि निधी गोळा करणे हा यामागे उद्देश आहे. याचे नेतृत्व मसूद अझरची बहीण करत आहे.
34
तामिळनाडूच्या महिला JeM च्या निशाण्यावर
जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, यूपी आणि तामिळनाडूसारख्या राज्यांतील महिलांना सोशल मीडियाद्वारे लक्ष्य केले जाईल. माहिती मिळवणे, निधी गोळा करणे आणि आत्मघाती हल्ल्यांसाठी त्यांना तयार केले जाऊ शकते.
ही संघटना छोट्या गटांमध्ये काम करेल. पुलवामा हल्ल्यासह अनेक हल्ल्यांची जबाबदारी JeM ने घेतली आहे. ही नवीन महिला टीम भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.